Google Virtual Diwali 2020 (Photo Credits: Google Arts & Culture)

दिवाळी हा प्रकाशाचा सण. कंदील, पतण्या, विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी यामुळे सर्वत्र प्रफुल्लित वातावरण असते. देशा-परदेशातही हा सण साजरा केला जात असल्याने सणाचा आनंद घेण्यासाठी आणि फाटक्यांची आतिषबाजी करण्यासाठी लोक एकत्र जमतात. परंतु, यंदाच्या कोविड-19 संकटामुळे दिवाळी सेलिब्रेशनमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे. गुगलच्या आर्ट्स अॅंड कलचलर टीमने व्हर्च्युअल दिवाळी साजरी करण्याचा अनोखा कॉन्स्पेट लॉन्च केला आहे. त्याद्वारे जगातील कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही दिवाळीचा आनंद घेऊ शकता. Google Arts & Culture च्या टीमने 20 वेगवेगळ्या कल्चरल ऑरगनायझेशनची भागीदारी करुन AR Diwali 2020 लॉन्च केलं आहे.

घरबसल्या व्हच्युअल दिवाळीचा आनंद घेण्यासाठी युजर्संना गुगलच्या अधिकृत आर्ट्स अँड कल्चलर वेबसाईटवर जाऊन  'Celebrate Diwali in AR' या बटणवर क्लिक करावे लागेल. या एआर दिवाळीचा अनुभव घेण्यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेटची सुविधा असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुमच्या स्मार्टफोनमध्ये एआरची सुविधा अनबेल असायला हवी.

पहा व्हिडिओ:

Google Virtual Diwali 2020 (Photo Credits: Google Arts & Culture)

या एआर दिवाळीच्या कॉन्सेप्ट मध्ये युजर्स आपल्या सभोवताली व्हर्च्युअल पणत्यांनी सजावट करु शकतात. त्याचप्रमाणे पाऊस, चक्री आणि काही फटाके यांचा सुद्धा आनंद घेऊ शकतात. त्याचप्रमाणे या एआर दिवाळीच्या कॉन्सेप्टमध्ये दिवाळीशी निगडीत तुम्ही एक व्हिडिओसुद्धा पाहु शकता. या व्हिडिओमध्ये लंडनच्या नेहरु सेंटरचे डिरेक्टर अमिश त्रिपाठी आणि कला इतिहासकार नील मॅकग्रीगोर यांच्यामधील संभाषण पाहु शकाल. त्याचप्रमाणे गुगलने गुगल आर्ट्स आणि कल्चरलच्या वेबसाईटवर विविध सजावट, खाद्यपदार्थ पाहायला मिळतील. तसंच दिवाळी सेलिब्रेशनचे विविध फोटोजही तुम्ही डाऊनलोड करु शकाल आणि रांगोळीच्या डिझाईन्स, दिव्यांची रोषणाई यांची एक स्पेशल गॅलरी देखील तुम्हाला पाहायला मिळेल.