Google Chrome Browser (Photo Credits-Twitter)

सध्या दिवसेंदिवस युजर्सचा डेटा चोरी होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. तर हॅकर्सकडून विविध उपायांच्या माध्यमातून युजर्सचा पर्सनल डेटा सुद्धा हॅक करत आहेत. त्यामुळे आता गुगलकडून सुद्धा युजर्सचा डेटा किंवा पासवर्ड हॅक होऊ नये म्हणून अपडेटच्या माध्यमातून सुचना देण्याचे काम करते. तर युजर्सचा पासवर्ड आता हॅक झाल्यास क्रोम ब्राउजर त्याबाबत अलर्टची सुचना देणार आहे. गुगल सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्वीट करत याची अधिक माहिती दिली आहे. या ट्वीटमधून या फिचर बद्दल सांगितले आहे.

सुंचर पिचाई यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, जर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड कॉम्प्रोमाइज्ड आणि तुम्ही कोणत्याही एखाद्या वेबसाईटवर गेल्यास तुम्हाला गुगल क्रोम अलर्ट करणार आहे. हे नवे फिचर युजर्सच्या सेफ्टीसाठी आणणार आहे. तसेच रियल टाइम फिशिंग प्रोटेक्शन मध्ये सुद्धा सुधारणा केली जात आहे.(स्मार्टफोनला आग लागण्याच्या दुर्घटनेपासून दूर राहण्यासाठी 'या' पद्धतीने घ्या खबरदारी)

यासाठी क्रोम सेटिंग्समध्ये जाऊन सिंक ऑप्शन सिलेक्ट करावे. हे ऑप्शन सध्या फक्त ज्यांनी क्रोमच्या सेफ ब्राउजिंग प्रोटेक्शन अंतर्गत साइन इन केले आहे. गुगलने या टेक्नॉलजीने सर्वात प्रथम पासवर्ड चेकअप एक्सटेंशनच्या रुपात लॉन्च केले होते. या फिचरचा विस्तार करत कंपनीने याला गुगल क्रोमच्या पासवर्ड प्रोटेक्शनसाठी सुद्धा लागू केला. तसेच अनसेफ पद्धतीची वेबसाईट गुगलकडून प्रत्येक 30 मिनिटानंतर रिफ्रेश करण्यात येते.