Flipkart Electronic Sale Live: फ्लिपकार्टवर आजपासून सेलला सुरुवात, iPhone 11 Pro ते Moto G 5G स्मार्टफोनवर मिळणार धमाकेदार सूट
Flipkart | Representational Image | (Photo Credit: Official)

Flipkart Electronic Sale आजपासून (26 डिसेंबर) लाइव्ह केले आहे. हा सेल 28 डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. या तीन दिवसांच्या सेलमध्ये जवळजवळ सर्व ब्रॅंन्ड्च्या स्मार्टफोनवर कमी किंमतीसह ऑफर्स मध्ये खरेदी करता येणार आहे. या सेलदरम्यान, iPhone 11 Pro, iPhone XR, Realme X3 Super Zoom आणि Moto G 5G स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. या सेलमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या कार्डच्या वापर करुन युजर्सला 10 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. तर जाणून घ्या फ्लिपकार्टच्या या इलेक्ट्रॉनिक सेलबद्दल अधिक.

Flipkart Electronic Sale मध्ये iPhone 11 प्रो अत्यंत कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. युजर्सला हा स्मार्टफोन 20 हजार रुपयांच्या डिस्काउंट नंतर फक्त 79,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर याची खरी किंमत 99,999 रुपये आहे. या व्यतिरिक्त एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयचा सुद्धा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. या डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5.8 इंचाचा डिस्प्ले ही दिला आहे.(Realme Days Sale: रियलमी च्या प्रीमियम स्मार्टफोन्सवर 7 हजार रुपयांपर्यंत सूट; जाणून घ्या 'रियलमी डेज सेल'च्या खास ऑफर्स)

जर तुम्ही iPhone XR खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तर फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये 47,900 रुपयांऐवजी 38,999 रुपयांना खरेदी करु शकता. या व्यतिरिक्त एक्सचेंज ऑफर अंतर्गत 13 हजार रुपयांचा ही लाभ घेता येणार आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि सफेद कलरच्या वेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

तसेच Moto G 5G स्मार्टफोनवर ही आकर्षक सूट दिली जाणार आहे. हा स्मार्टफोन 20,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. मात्र सेलमध्ये तो आता 19,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. मोटोच्या या स्मार्टफोनमध्ये ट्रिपर रियर कॅमेरा सेटअप आणि 5000 ची बॅटरी दिली आहे.(Amazon Christmas 2020 Sale Offers: ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर OnePlus8T 5G, Redmi Note 9 Pro, Mi Band 5 सह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर धमाकेदार ऑफर्स, डिस्काऊंट)

या व्यतिरिक्त Realme X3 Super Zoom स्मार्टफोनवर 4 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे युजर्सला हा स्मार्टफोन 27,999 रुपयांऐवजी 23,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 64mp क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच 120Hz रिफ्रेश रेटसह 6.57 इंचाचा डिस्प्ले ही मिळणार आहे.