Realme Days Sale: तुम्ही स्वत: साठी किंवा आपल्या नातेवाईकासाठी नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला रियलमी डेज सेल (Realme Days Sale) मध्ये खास ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. या सेलमध्ये रियलमीचे लोकप्रिय स्मार्टफोन मोठ्या ऑफर आणि सवलतीसह उपलब्ध केले जात आहेत. या सेल अंतर्गत वापरकर्ते कंपनीच्या वेबसाइटवरून किंवा फ्लिपकार्टवरून त्यांचे आवडते रियलमी स्मार्टफोन खरेदी करु शकतात. सध्या या सेलमध्ये रियलमीच्या प्रीमियम स्मार्टफोनवर कोणत्या ऑफर्स दिल्या जात आहेत, हे जाणून घेऊयात. (हेही वाचा - Amazfit GTS 2 भारतात लॉन्च; OxygenBeats AI Engine सह काय आहेत इतर फिचर्स आणि किंमत? जाणून घ्या)
Realme X50 Pro -
रियलमीच्या या प्रीमियम फोनवर 7 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. या व्हेरिएंटची किंमत 41,999 रुपयांवरून 34,999 रुपयांवर आणली गेली आहे. फोनमध्ये 65 वॅट फास्ट चार्जिंग आणि 64 मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअपसह 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सारखे उत्कृष्ट फीचर्स आहेत. हा फोन स्नॅपड्रॅगन 865 5G प्रोसेसरवर कार्य करतो. (हेही वाचा - Mivi Roam 2 ब्लूटूथ स्पिकर भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन)
रियलमी X3 सुपरजूम -
रियलमी डेज सेलमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी अंतर्गत स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 4 हजार रुपयांनी कमी केली आहे. तुम्ही किंमत कमी झाल्यानंतर 32,999 रुपये किंमतीचा हा फोन 28,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फोनमध्ये 60 मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप आहे, जो 60 एक्स सुपरझूमसह देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा ड्युअल इन-डिस्प्ले कॅमेरा आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर असून रीफ्रेश रेट 120Hz आहे.
Offers are back! #realmeDays
Head to https://t.co/EgEe8viGtE, Mainline Stores and Flipkart for further info. pic.twitter.com/A3VCnU4q5c
— Madhav Sheth (@MadhavSheth1) December 20, 2020
रियलमी X3 -
या सेलमध्ये रियलमी X3 फोनवर 3 हजार रुपयांच्या सूट देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन 21,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसरसह सज्ज असलेल्या या फोनमध्ये 120 हर्ट्झचा अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले आहे. याशिवाय फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 20x हायब्रिड झूमसह 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये 30 डब्ल्यू जलद चार्जिंगसह 4200mAh बॅटरी देण्यात आली आहे.