सध्याच्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटादरम्यान आरोग्य सेतू मोबाइल अॅप (Aarogya Setu App) खूपच फायदेशीर ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही हे अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करण्याचे सुचविले आहे. आतापर्यंत सुमारे दोन कोटी लोकांनी त्यांच्या मोबाईलवर आरोग्य सेतु अॅप डाउनलोड केले आहेत. अशात भारत सरकारची पॉलिसी थिंक-टैंक (GOI), नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आरोग्य सेतू मोबाइल अॅपच्या नवीन वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली. एका ट्वीटमध्ये कांत यांनी सांगितले आहे की, या अॅपमध्ये आता कॉल आणि व्हिडिओद्वारे ऑनलाईन समुपदेशन, होम लॅब चाचणी आणि ईफर्मासी वैशिष्ठ्ये समाविष्ठ असतील.
#AarogyaSetu now brings to you to Online Medical Consultations (call and video), Home Lab Test and ePharmacy. AarogyaSetuMitr, the stack powering this new feature, is developed in collaboration & partnership of @NITIAayog and @PrinSciAdvGoI (1/2)
— Amitabh Kant (@amitabhk87) May 3, 2020
त्यांनी पुढे सांगितले की, AarogyaSetuMitr हे नीती आययोग आणि प्रधान वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) के विजय राघवन यांच्या सहकार्याने आणि भागीदारीने विकसित केले गेले आहे. सर्व खासगी आणि सरकारी कर्मचार्यांना हे अॅप डाउनलोड करणे बंधनकारक करण्याचा आदेशही केंद्र सरकारने जारी केला आहे. आरोग्यासेतूमित्र मध्ये संस्था, उद्योग कोलशन्स आणि स्टार्टअप्सचा स्वयंसेवी सहभाग आहे. लोकांना वैद्यकीय सहाय्य करण्यासाठी दिवसभरात 200 पेक्षा अधिक डॉक्टर इथे उपलब्ध आहेत व आणखी डॉक्टर जोडले जात आहेत. जनतेने घराबाहेर पडू नये म्हणून हा उपक्रम राबवला जात असल्याचे, कांत यांनी सांगितले. (हेही वाचा: दिल्ली: CRPF च्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने मुख्यालय सील, पुढील आदेशापर्यंत बंद राहणार)
दरम्यान, आरोग्य सेतु अॅप हे हिंदी आणि इंग्रजीसह 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि आपल्या जवळपास 10 किलोमीटरपर्यंतच्या एरियाची माहिती देऊ शकतो. हे अॅप प्लेस्टोर वरून डाउनलोड केले जाऊ शकते. त्याकरिता मोबाइलमध्ये लोकेशन, ब्लूटूथ आणि डेटा असणे आवश्यक आहे. आरोग्य सेतु अॅपने ग्रीन झोन दर्शविल्यास त्याचा अर्थ असा आहे की आपण सुरक्षित ठिकाणी आहात आणि जर पिवळा झोन दर्शविला तर याचा अर्थ असा आहे की, आपल्या आजूबाजूला कोरोना संक्रमित व्यक्ती आहे.