Facebook वरील पोस्टला किती Likes मिळाले हे आता दिसणार नाही
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

सोशल मीडियावरील जगप्रसिद्ध असणाऱ्या फेसबुकचे (Facebook) युजर्सची संख्या लाखोच्या घरात आहे. मात्र फेसबुकवरील एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाइलला किती लाईक्स (Likes) किंवा कमेंट्स (Comments) आहेत हे सध्या तरुणाईमध्ये फार पाहिले जाते. परंतु जर एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाइलला जास्त लाइक्स नसल्यास त्याबाबत खंत व्यक्त केली जाते. यामुळे परस्पर विरोधी युजर्समध्ये लाईक्स वरुन भांडण झाल्याचे प्रकार यापूर्वी दिसून आले आहेत. त्यामुळेच आता फेसबुकने ही गोष्ट लक्षात घेऊन फेसबुक पोस्टच्या खाली दाखवणाऱ्या लाईक्सची संख्या किती हे आता दाखवले जाणार नाही आहे.

फेसबुकने अधिकृतरित्या युजर्सच्या पोस्टखाली दाखवल्या जाणाऱ्या लाईक्सची संख्या हाइड करण्यास सुरुवात केली आहे. 27 सप्टेंबरपूर्वी असे पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया येथे करण्यात येणार आहे. त्यामुळे पोस्ट करणाऱ्या युजर्सला लाईक्स किंवा रिअॅक्शन किती आहेत हे दिसणार आहेत. मात्र अन्य जणांना ती गोष्ट दिसणार नसून फक्त म्युच्युल फ्रेन्ड्स यांच्या नावासह रिअॅक्शन आयकॉन्स दाखवण्यात येणार आहे. अशाचप्रकारे अन्य युजर्स एकमेकांच्या पोस्ट आल्यावर मिळाणारे लाइक्स काउंट पाहू शकणार नाही आहेत.

तसेच युजर्सला अन्य युजर्सच्या पोस्टला देण्यात येणाऱ्या कमेंट्सची संख्या किंवा पोस्टवर व्हिडिओ व्हूज सुद्धा पाहू शकणार नाही आहेत. मात्र सध्या फेसबुकवर पोस्टला मिळणारे लाईक्स आणि कमेंट्स पाहता येणार आहेत.फेसबुकने याबाबत असे सांगितले आहे की, फेसबुकवर लाईक्स आणि कमेंट्समुळे होणाऱ्या भांडणामुळे कोणता नवा वाद होऊ नये. तसेच हा एक एक्सपेरिमेंट असून यामुळे नवा फॉर्मेट कशा पद्धतीने वापरतात हे पाहणार आहे. (आता मोबाईल चोरांना बसणार फटका ; सरकारकडून राबवले जाणार नवे उपक्रम)

फेसबुक या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवरील युजर्सच्या मनावर होणारे परिणाम लक्षात घेता लाईक्सची संख्या हाइड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल मीडियवर युजर्सला मिळणारे लाईक्सच्या तणावामुळे सायबर हल्ले किंवा आत्महत्येचे प्रकार समोर आले आहेत. मात्र नव्या सिस्टममुळे लाईक्स आयकॉन्सच्यावर टॅप करुन पाहू शकता येणार आहे. यामुळे कोणी तुमच्या पोस्टला लाइक केले  आहे हे समजू शकणार आहे. परंतु टाईमलाइन स्क्रोल करताना लाईक्सची संख्या दिसून येणार नाही आहे.