आता मोबाईल चोरांना बसणार फटका ; सरकारकडून राबवले जाणार नवे उपक्रम
मोबाईल (प्रतिकात्मक फोटो) (Photo Credits: Pixabay)

मोबाईल हा आपल्या जीवनातला महत्वाचा बनला आहे. आपण घराबाहेर पडताना  डबा घेऊन जायचे विसरु. मात्र, सोबत मोबाईल घेऊन जायचे विसरत नाहीत. आजच्या काळात मोबाईल गरजेची वस्तू झाली आहे. मोबाईलशिवाय अनेकांची नेहमीची कामे अडकून पडतात. पण आता मोबाईल हरविला किंवा चोरीला गेला, तर घाबरण्याचे कारण नाही. कारण तुमचा मोबाईल शोधण्यासाठी केंद्र सरकारचा नवा उपक्रम तुमच्या उपयोगाला येणार आहे. देशात अब्जाहून अधिक मोबाईलचा वापर केला जातो. सरकारच्या या नव्या उपक्रमातून अनेकांना फायदा होणार आहे.

सरकारने २०१७ पासून दूरसंचार विभागाकडून सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर तयार करण्याचे काम जोरात चालू आहे. या प्रक्रियेत मोबाईलचे आयएमईआय क्रमांक नोंदवण्यात येत आहेत.या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून बनावट मोबाईल हँडसेट शोधण्यासही मदत होणार आहे. याबद्दलची आणखी माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याआधी ज्या लोकांचा मोबाईल चोरीला गेला आहे, अशा लोकांनाही त्यांचा मोबाईल फोन ब्लॉक करता येणार आहे. यासाठी दूरसंचार विभागाकडून हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. हे देखील वाचा-Engineer's Day 2019 Memes: इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांचे आयुष्य मांडणारे हे Funny Memes तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडतील, नक्की पाहा

मोबाईल हरवला अथवा चोरीला गेल्यास काय करायचे?

जर तुमचा फोन चोरीला अथवा हरवला असेल तर, प्रथमता जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच दुरसंचार विभागाच्या हेल्पलाईनला मोबाईल हरवल्याची माहिती द्यावी लागेल. दुरसंचार विभागाला माहिती देण्यासाठी 14422 हा क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. संबधित व्यक्तीने तक्रार केल्यानंतर दूरसंचार विभागाकडून ताबडतोब हरवलेला अथवा चोरीला गेलेला मोबाईल ब्लॉक केला जाईल. त्यामुळे त्या मोबाईल हँडसेटमध्ये कोणतेही नवे सीमकार्ड टाकून तो वापरता येणार नाही. यामुळे एक प्रकारे हा हँडसेट निरुपयोगी ठरणार आहे.