Engineer's Day 2019 Memes: इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांचे आयुष्य मांडणारे हे Funny Memes तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडतील, नक्की पाहा
Engineer's Day Memes (Photo Credits: File Image)

दहावीनंतर करिअरची दिशा अशा चर्चासत्रात सर्वाधिक चर्चिला जाणारा पर्याय म्हणजे इंजिनिअरिंग. घर बांधण्यापासून ते आपण वापरत असणारी कोणतीही तांत्रिक गोष्ट घडवण्या पाठीमागे या इंजिनिअर्सचे भक्कम हात आणि चलाख मेंदू असतो, त्यामुळे साहजिकच या क्षेत्रात करिअर करण्याकडे अनेकांचा कल असतो. चार वर्ष अथक परिश्रम घेत इंजिनिअरिंगची डिग्री मिळवताना असंख्य लेक्चर्स, प्रोजेक्ट्स, असाइन्मेंट्स, आणि त्यात विरंगुळा म्हणून कॉलेज फेस्ट अशी सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत के टी च्या भवसागरात हे इंजिनिअर्स आपली नौका पार करण्याच्या प्रयत्नात असतात, अशा कठोर परिश्रमी जीवांना एक सलाम करण्यासाठी यंदा 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिवस (Engineer's Day 2019) साजरा केला जाणार आहे. चला तर मग याच निमित्ताने त्यांचा प्रवास मांडणाऱ्या काही मजेशीर मिम्सवर एक नजर टाकुयात..

 

View this post on Instagram

 

#engineers #attendance #college #study #engineering #collegegirls #lecture #lecturers #puneriengineers #puneri_engineers

A post shared by #Engineering_Life (@puneri_engineers) on

दरम्यान अलीकडे सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टीतून मिम्स बनायला अवघ्या काहीच सेकेंदाचा वेळही पुरेसा ठरतो. त्याचप्रमाणे अलीकडे इंस्टाग्राम, फेसबुक अशा सर्वच माध्यमांवर मीम पेजेस सुरु झाले आहेत. यामध्ये कामावर जाणाऱ्यांपासून ते विद्यार्थी, गृहिणी अशा सर्वांचे आयुष्य मांडणारे हटके जोक्स शेअर केले जातात.