Email Sending Tips (Photo Credits; PixaBay)

सध्या डिजिटलाईज्ड झालेल्या दुनियेत ईमेल (Email) सारखा पर्याय उपलब्ध झाल्याने जग किती जवळ आले आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. क्षणार्धात तुमच्यापासून कोसो दूर राहत असलेल्या व्यक्तीला तुमचा संदेश (Message) पोहोचवतो. याच ईमेलच्या माध्यमातून नोकरी साठी अप्लाय करणे, व्यवसाय, काम-धंद्यात अनेक महत्त्वाची माहिती पाठवणे सोपे झाले. यामुळे आता तुम्हाला नोकरीसाठी कुठल्याही कंपनीत खेटा न मारता एका ईमेलच्या माध्यमातून जॉबसाठी अप्लाय करु शकता. मात्र हा ईमेल पाठवताना काय गोष्टींची काळजी घ्यावी वा तुम्ही अनेकांना मेल करत असाल तर त्यासाठी काय नियम आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. मेल पाठवताना स्क्रिनवर दिसणारे To, Cc, Bcc याचा नेमका अर्थ काय आणि त्यांचे काम काय आहे हे तुम्हाला माहित आहे का?

सर्वसामान्यपणे आपल्याला ज्याला मेल पाठवायचो असतो त्याला ईमेल आयडी To पुढे लिहून त्या व्यक्तील सेंड केला जातो. त्याच्याखाली असणा-या Cc आणि Bcc याची काय कामे असतात हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या सविस्तर  Cyber Attack : या 'Email Id' पासून सावधान ! चिनी हॅकर्सकडून 40 हजारांहून जास्त सायबर हल्ले

1. To- ज्याला मेल करायचा आहे त्याचा मेल आय डी येथे लिहावा.

येथे तुम्ही एका ईमेल अॅड्रेसपुढे स्वल्पविराम देऊन एकापेक्षा जास्त मेल आयडीची यादी देऊन एकच मेल एका वेळी अनेकांना पाठवता येतो.

2. Cc (Carbon Copy)- कार्बन कॉपी म्हणजे म्हणजे तोच इमेल अन्य कोणाला पाठवायचा असेल तर येथे स्वल्पविराम देऊन त्यांचे ईमेल आयडी लिहावा. या लिहिलेले ईमेल आयडीची यादी या यातील प्रत्येकाला दिसले ज्यांना तुम्ही हा मेल पाठवला असाल.

3. Bcc (Blind Carbon Copy)- जर मेल पाठवणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला ही मेल आय डी ची यादी दिसू नये असे वाटत असेल तर ती यादी स्वल्पविराम देऊन वेगळी करत येथे लिहावी.

तर मग कशी वाटली ही माहिती? ज्यांना नोकरी धंद्यात ईमेल पाठविण्याचा अनेकदा संबंध येतो. अशा लोकांना ही माहिती फार महत्त्वाची ठरेल.