QR Code Scam: क्यूआर कोडच्या साहाय्याने ग्राहकांना याप्रकारे लुटत आहेत सायबर ठग; 'असा' करा तुमचा बचाव
QR Code (PC - pixabay)

QR Code Scam: सध्या ऑनलाइन फसवणूकीचे प्रकार खूप वाढले आहेत. विशेषत: क्यूआर कोड घोटाळ्याची (QR Code Scam) प्रकरणे अधिक वाढली आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता एका ऑनलाइन घोटाळ्याची शिकार झाली होती. ती जुना सोफा सेट ऑनलाइन विकत होती. त्यानंतर ती सायबर फसवणुकीचा बळी ठरला. असाचं प्रकार मुंबईतील एका व्यक्तीसोबत घडला. त्याला त्याचे फर्निचर ऑनलाइन मार्केटप्लेसवर विकायचे होते. त्यांनी ऑनलाइन जाहिरात केली. एका खरेदीदाराने त्याला कॉल केला आणि QR कोड स्कॅन करण्यास सांगितले. सायबर ठगांनी त्यांची 5 हजार रुपयांची फसवणूक केली. QR कोड घोटाळा टाळण्यासाठी काही खास मार्ग आहेत. सायबर तज्ज्ञांच्या मते, या गोष्टींचा अवलंब करून तुम्ही सायबर फसवणूक टाळू शकता. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया: Meta: यावर्षी फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये भरती होणार नाही, खर्च कमी करण्यासाठी मेटाने रणनीतीत केला मोठा बदल)

रिमोट ऍक्सेस देणे:

सायबर तज्ञांच्या मते, अनव्हेरिफाइड अॅप डाउनलोड केल्याने त्यांना डिव्हाइसवर रिमोट ऍक्सेस मिळतो. याचा वापर फसवणूक करणारे UPI द्वारे पैसे चोरण्यासाठी करू शकतात.

बी फिशिंग घोटाळा:

काही अनव्हेरिफाइड पेमेंट लिंक एसएमएसद्वारे मोबाइलवर पाठवल्या जातात. लिंकवर क्लिक करून, मोबाइल वापरकर्त्यांना त्यांच्या फोनवरील UPI पेमेंट अॅपवर नेले जाते. ते तुम्हाला ऑटो डेबिटसाठी कोणतेही अॅप निवडण्यास सांगेल. परवानगी दिल्यानंतर लगेचच तुमच्या खात्यातून रक्कम कापली जाईल. त्यामुळे असे एसएमएस टाळा.

OTP आणि PIN शेअरिंग:

RBI ने वारंवार चेतावणी दिली आहे की, ग्राहकांनी त्यांचा UPI पिन किंवा OTP कोणाशीही शेअर करू नये. असे असूनही, काही फसवणूक करणारे ग्राहकांना त्यांच्या फोनवर मिळालेला OTP शेअर करण्याचे आमिष दाखवण्यात यशस्वी होतात. ते शेअर केल्यानंतर, फसवणूक करणारे बेकायदेशीर व्यवहार प्रमाणित करू शकतात आणि पैसे चोरू शकतात.

फेक हँडल:

काही स्मार्ट हॅकर्स त्यांच्या UPI सोशल पेजेसवर BHIM किंवा SBI सारखी नावे वापरतात जेणेकरून ते विश्वसनीय UPI प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे UPI वापरकर्त्यांनी या फसवणुकीपासून सावध राहावे.