BSNL (Photo Credit: Livemint)

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव्या सुविधा देत आहेत. प्रिपेड प्लॅनसह कंपनी ब्रॉडब्रॅन्ड प्लान सुद्धा आणत आहे. बीएसएनएल त्यांच्या फायबर आधारित ब्रॉडबॅन्ड सर्विसच्या आधारावर ग्राहकांना हायस्पीड डेटा सुविधा देते. प्रीपेडसारखेच कंपनीचे काही ब्रॉडबॅन्ड प्लानसुद्धा डेली लिमिटसह येतात.

तर आता सणासुदीच्या काळात बीएसएनएल आता एक धमाकेदार ब्रॉडबॅन्ड सुविधा घेऊन आला असून युजर्सला आता दररोज 170GB डेटासह 100Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड देणार आहे. जाणून घ्या बीएसएनएलच्या अन्य काही ब्रॉडब्रॅन्ड सुविधा कोणत्या आहेत.(WhatsApp वर लवकरच येणार एक नवं फिचर, 5 मिनिटांत गायब होणार मेसेज)

>>2GB BSNL CUL प्लॅन- ₹349

349 रुपयांच्या या महिनाभराच्या या 2GB CUL प्लॅनमध्ये युजर्सला प्रत्येक दिवशी 2GB डेटा मिळणार आहे. तसेच 8Mbps इंटरनेट स्पीड देण्यात येणार आहे. परंतु इंटरनेट युजची लिमिट संपल्यानंतर त्याची स्पीड 1Mbps होते. मात्र यामध्ये रात्रीच्या वेळेस कॉलिंगवेळी पैसे आकारण्यात येत नाहीत.

>>4GB BSNL CUL प्लॅन- ₹599

599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सला 4GB डेटा प्रतिदिनी दिला जातो. प्लानमध्ये 100Mbps स्पीड दिली जाते. FUP लिमिट संपल्यानंतर स्पीड 2Mbps करण्यात येते. तसेच युजर्सला बीएसएनएलच्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा दिली जाते.

बीएसएनलचे असे काही प्लॅन आहेत त्यामध्ये 100Mbps स्पीड देण्यात येते. त्याची किंमत प्रत्येक प्लॅननुसार वेगळी असून त्यासाठी एक स्पेशल सुविधा सुद्धा युजर्सला दिली जाते. त्यामुळे ग्राहकांनी बीएसएनएलच्या या सुविधेचा फायदा जरुर होईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.