पर्सनल डेटा (Personal Data) सुरक्षित राहण्यासाठी गुगल क्रोम एक्सटेंशन (Google Chrome Extension) इन्स्टॉल करताना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. कारण युजर्सची वैयक्तिक माहिती धोक्यात आणणाऱ्या 100 हून अधिक लिंक्स हाती आल्या आहेत. त्या हटवण्यात आल्या आहेत. दरम्यान युजर्सच्या सायबर सुरक्षेसाठी देशाच्या सुरक्षा एजेन्सीकडून ही महत्त्वपूर्ण माहिती आज देण्यात आली आहे. भारताच्या सायबर स्पेसची सुरक्षा करणारे आणि सायबर हल्ल्यांचा सामना करणारी एजेन्सी 'द कम्प्यूटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया' यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एक्सटेन्शनमध्ये असे कोड्स होते जे गुगल क्रोमच्या सिक्युरिटीच्या नियमांच्या विरुद्ध होते.
खाजगी डेटा धोक्यात घालणाऱ्या या लिंक्समध्ये स्क्रिनशॉट काढण्यासाठी, क्लिपबोर्ड वाचण्यासाठी आणि युजर्सचे पासवर्ड जाणून घेण्यासाठी तसंच गोपनीय माहिती जाणून घेण्याची क्षमता होती. एजेंन्सीने पुढे सांगितले की, युजर्सची खाजगी माहिती गोळा करणारे गुगल क्रोम वेब स्टोरमधून गुगल क्रोम ब्राऊजरचे 106 एक्सटेन्शन हटवण्यात आले आहेत. या एक्सटेन्शनच्या उपयोग करुन युजर्स इंटरनेटवर सर्च करत असलेल्या गोष्टी त्वरीत दाखवल्या जात होत्या. त्याचप्रमाणे काही एक्सटेंशनचा वापर फाईलचा फॉरमॅट बदलण्यासाठी होत होता. तर काही एक्सटेन्शन्स सुरक्षेसाठी वापरले जात होते. त्यामुळे संघीय सायबर सुरक्षा एजेन्सीने युजर्सला गुगल क्रोम एक्सटेन्शन हटवण्याच सल्ला दिला आहे.
युजर्स क्रोममधील डेव्हलपर्स मोडमध्ये जावून अशाप्रकारचे एक्सटेंशन आहे की नाही हे तपासून पाहू शकतात. असे एक्सटेंशन सापडल्यास ब्राऊजरमधून ते हटवण्यात येईल. एजेन्सीने युजर्संना असा सल्ला दिला आहे की, अत्यंत आवश्यकता असलेले एक्सटेन्शन केवळ क्रोममध्ये अॅड करा आणि एक्सटेंशन अॅड करण्यापूर्वी त्या एक्सटेंशनचे रिव्ह्यू नक्की वाचा. तसंच ज्यांचे सोर्स फेक वाटत आहेत असे एक्सटेंशन इन्स्टॉल करा.