Battlegrounds Mobile India चाहत्यांसाठी खूशखबर; बेटलग्राऊंड मोबाईल इंडिया Google Play Store वर Pre-Registered Users साठी उपलब्ध
Battlegrounds Mobile India (Photo Credits: Battlegrounds Mobile India)

Battlegrounds Mobile India चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हा खेळ आता खेळण्यासाठी उपलब्ध झाला आहे. अर्थात हा खेळ सध्या केवळ चाचणीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे ही आनंदवार्ता 'अटी लागू' या संकल्पनेसह उपलब्ध असणार आहे. अर्थात Battlegrounds Mobile India चे अधिकृत व्हर्जन लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सध्यास्थितीत तरी हा खेळ जर आपल्याला खेळायचा असेल तर आवल्याला टेस्टर बणण्यासाठी प्रथम नोंदणी करावी लागेल. जे मंडळी ऑफिशिअली टेस्टर म्हणून नोंदणी करतील त्यांच्यासाठी हा गेम सहज उपलब्ध असणार आहे.

सध्या स्थिती हा गेम केवळ टेस्टरसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे बहुतेकांना हा गेम डाऊनलोड करताना अडचणी येत आहेत. अनेक युजर्सना टेस्टींग पेज ओपन केल्यावर एक मेसेज दिसत आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे की, Battlegrounds Mobile India गेम डाऊनलोड करण्यासाठी इच्छा व्यक्त केलीत त्याबद्दल धन्यवाद. (हेही वाचा, Battlegrounds Mobile खेळण्यासाठी OTP ची गरज भासणार, जाणून घ्या अधिक)

दरम्यान, टेस्टर प्रोग्रामच्या माध्यमातून काही लोकांनी हा गेम डाऊनलोड केला आहे. काही यूजर्सनी ट्विटरवर स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. अशा प्रकारचे स्क्रीनशॉट शेअर करत गेमची साईज 721MB असल्याचे म्हटले आहे. काही उत्साही युजर्सनी या गेमचे व्हिडिओ फुटेजही शेअर केले आहे.