Battlegrounds Mobile खेळण्यासाठी OTP ची गरज भासणार, जाणून घ्या अधिक
Krafton’s Battlegrounds Mobile India New Logo (Photo Credits: Official Website of Battlegrounds Mobile India)

बॅटलग्राउंड इंडियाच्या  (Battlegrounds India) लॉन्चिंग संदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. याच दरम्यान, या गेमच्या सपोर्ट पेजवर अपडेट करण्यात आले आहे. त्यानुसार बॅटलग्राउंड इंडिया गेम खेळण्यासाठी OTP ची गरज भासणार आहे. सपोर्ट पेजनुसार, Battlegrounds Mobile India मध्ये लॉगइन करण्यासाठी युजर्सला ओटीपी द्यावा लागणार आहे. पबजी मोबाईल मध्ये असे काहीही नव्हते. लॉगिनसाठी गुगल प्ले, फेसबुक आणि गेस्ट अकाउंटचे ऑप्शन दिला जात होता.(PUBG प्रेमींसाठी खुशखबर! Battlegrounds Mobile India साठी रजिस्ट्रेशन सुरु, जाणून घ्या स्टेप्स)

बॅटलग्राउंड इंडिया हे पबजी मोबाईलचे इंडियन वर्जन आहे. याच्या लॉन्चिंग बद्दल अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. साउथ कोरियन डेव्हलपर Krafton ने ओटीपी ऑथेंटिकेशनचे नियम अपडेट केले आहेत. बॅटलग्राउंड मोबाईल इंडियाच्या सपोर्ट पेजवर सांगितले जात आहे की, एका युजर्सला किती वेळा ओटीपीसाठी रिक्वेस्ट टाकण्याची परवानगी आहे. या व्यतिरिक्त ओटीपी संदर्भात सुद्धा अधिक माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे असे मानले जात आहे की, बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया मध्ये लॉगिनसाठी युजर्सला मोबाईल क्रमांक शेअर करावा लागणार आहे. यावर ओटीपी येऊन शकतो आणि अकाउंट वेरिफाय केले जाईल.(PUBG Mobile India आता Battlegrounds Mobile India नावाने लॉन्च करण्याची शक्यता- रिपोर्ट्स)

सध्या तरी हाच लॉगिनसाठी मार्ग असल्याचे मानले जात आहे. मात्र पेजवर नंतर ही अपडेट हटवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याबद्दल Gadgets360 ने रिपोर्ट केले आहे. या संबंधित वेबसाइटवर एक आर्काइव लिंक सुद्धा पोस्ट केली आहे.वेबसाइटवर असे सांगण्यात आले आहे की, एका युजरला फक्त तीन वेळा वेरिफाय कोड एंटर करण्याची परवानगी असणार आहे. त्यानंतर ते काम करणे बंद करणार आहे. वेरिफाय कोडची वॅलिडिटी 5 मिनिटांसाठीच असणार आहे. त्यानंतर तो कोड एक्सपायर गोणार आहे. एका सिंगल फोनच्या माध्यमातून 10 अकाउंट रजिस्टर करता येणार आहेत.