Battlegrounds Mobile India (Photo Credits: PUBG Mobile India Facebook)

पबजी मोबाईल इंडिया (PUBG Mobile India) लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर लॉन्चिंगसह कंपनीने या गेमचे अधिकृत नाव बदलून आता बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया (Battleground Mobile India) असे केले आहे. या संबंधित पबजी मोबाईल इंडिया यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक आणि युट्युब चॅनलवर त्या संबंधित पोस्ट सुद्धा केली आहे. बॅटल रॉयल गेम हा भारतात बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया नावाने लॉन्च होऊ शकतो. मात्र गेम कधी लॉन्च करण्यात येणार त्या संबंधित स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र लवकरच हा गेम युजर्सला उपलब्ध करुन दिला जाईल अशी अपेक्षा आहे.

पबजी मोबाईल गेमवर गेल्या वर्षात युजर्सच्या डेटा सुरक्षिततेला धोका असल्याच्या कारणास्तव त्यावर भारतात बंदी घातली गेली. त्यानंतर पबजी मोबाइल डेव्हलपर्स यांनी असे जाहीर केले होते की, भारतासाठी स्वतंत्र असा पबजी मोबाइल इंडिया गेम लॉन्च केला जाईल. तर आता क्राफ्टॉन (Krafton) यांच्याकडून बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया हा लॉन्च केला जाणार आहे. यामागील कारण म्हणजे पबजी मोबाईल इंडियावर बंदी घातल्यानंतर युजर्सवर छाप पाडण्यासाठी नावात बदल करण्यात आला आहे.(PUBG Mobile India ने काही वेळातच Delete केला YouTube वर लॉन्च केलेला टीझर)

गेल्या आठवड्यात पबजी मोबाईल इंडियाकडून त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर गेम संबंधित एक टीझर लॉन्च केला होता. पण लाईव्ह झाल्यानंतर तो टीझर डिलीट करण्यात आला. त्या टीझरमध्ये गेम संबंधित काही माहिती असलेल्या गोष्टी आणि फिचर्स झळकवण्यात आले होते. या व्यतिरिक्त पबजी डेव्हलपर्सकडून भारतातील कर्मचाऱ्यांची सु्द्धा कामासाठी नेमणूक करत आहेत. कंपनीने Linkdin वर त्यांच्याकडे असलेल्या नोकर भरती संबंधित पोस्ट केली आहे. डेव्हलपर्सकडून भारतात $100 मिलियनची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.