PUBG प्रेमींसाठी खुशखबर! Battlegrounds Mobile India साठी रजिस्ट्रेशन सुरु, जाणून घ्या स्टेप्स
Krafton’s Battlegrounds Mobile India New Logo (Photo Credits: Official Website of Battlegrounds Mobile India)

भारतात पबजी (PUBG) गेमवर बंदी आणल्यानंतर इंडियन वर्जन असलेल्या 'बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया' (Battlegrounds Mobile India) गेम कधी लॉन्च केला जाणार याची प्रतीक्षा केली जात आहे. अशातच आता युजर्सची प्रतीक्षा संपली असून आजपासून बॅटलग्राउंड मोबाइल इंडियासाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोरचा आधार घ्यावा लागणार आहे. माहितीसाठी लक्षात असू द्या की, सध्या हा गेम फक्त अॅन्ड्रॉइड वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध करुन दिला आहे.तर कंपनीने हे सुद्धा स्पष्ट केले आहे की, बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया iOS वर चालणाऱ्या डिवाइसमध्ये उपलब्ध करुन दिला जाणार नाही आहे.

कंपनीने असे म्हटले आहे की, प्री-रजिस्ट्रेशन करणाऱ्या युजर्सला रिवॉर्ड्ससाठी क्लेम करता येणार आहे. हे रिवॉर्ड्स फक्त भारतीय युजर्ससाठी असणार आहेत. प्री-रजिस्ट्रेशन करण्यासाठी युजर्सला गुगल प्ले स्टोअरला भेट द्यावी लागेल. तेथे गेल्यानंतर Pre-Registration बटणावर क्लिक करावे लागणार आहे. गेम लॉन्च झाल्यानंतर क्लेम करण्यासाठी रिवॉर्ड्स तुम्हाला आपोआप उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पबजी मोबाइल प्रमाणेच हा गेम सुद्धा सर्व युजर्सला खेळण्यासाठी मोफत उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

या गेममध्ये काही बदल करण्यात आले आहेत. कंपनीकडून नुकत्याच लॉन्च केलेल्या लोकप्रिय सॅनहोक मॅपचा समावेश केला जाणार आहे. सॅनहोक पबजी मोबाइल मध्ये सप्टेंबर 2018 मध्ये उपलब्ध करुन दिला होता. कंपनीने याची झलक आपल्या फेसबुक पेजद्वारे दाखवली आहे. त्यामुळे कंन्फर्म झाले आहे की, यामध्ये सुद्धा पबजी प्रमाणे सॅनहोक मॅप दिला जाणार आहे.(PUBG पेक्षा Battlegrounds Mobile India मिळणार धमाकेदार फिचर्स, 18 वर्षाखालील मुलांसाठी असणार 'हे' नियम)

तर दक्षिण कोरियाच्या क्राफ्टनने पबजी इंडिया दुसऱ्यांदा प्रोडक्शनसाठी चीनच्या टेनसेंट गेम्स सोबत आपली पार्टनरशीप तोडली होती. क्राफ्टनने नव्या गेमसाठी एक वेगळी वेबसाइट बनवली आहे. क्राफ्टनने असे सांगितले की. गेम खेळण्यासाठी आउटफिट्स सारखे इन-गेम इवेंट्स आणि अन्य टूर्नामेंट्सची सुद्धा मजा घेता येणार आहे.

कंपनीनुसार, 18 वर्षाखालील मुलांना गेम खेळण्यासाठी काही नियम लागू केले आहेत. त्यांना गेम खेळण्यासाठी आपल्या पालकांची परवानगी घेण्यासह त्यांचा मोबाइल क्रमांक सुद्धा द्यावा लागणार आहे. क्राफ्टन यांनी असे ही स्पष्ट केले आहे की, बॅटलग्राउंड मोबाइल इंडियाच्या भारतीय गेम प्रेमींसाठी खास पद्धतीने तयार करण्यात आला आहे. कंपनीकडून हा गेम लवकरच लॉन्च केला जाणार आहे.