PUB G पेक्षा Battlegrounds Mobile India मिळणार धमाकेदार फिचर्स, 18 वर्षाखालील मुलांसाठी असणार 'हे' नियम
Battlegrounds Mobile India (Photo Credits: PUBG Mobile India Facebook)

मोबाईल गेम प्रेमींसाठी खुशखबर आहे. कारण पबजी गेम डेव्हलप करणारी कंपनी Krafton ने एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, भारतात लवकरच PUBG Global चे इंडियन वर्जन Battleground Mobile India लॉन्च केला जाणार आहे. ज्यामध्ये युजर्सच्या खासगी डेटासह सिक्युरिटी संदर्भात विशेषकरुन लक्ष दिले गेले आहे. कंपनीच्या मते, Battleground India फिचर्स हे पबजी पेक्षा अधिक धमाकेदार असणार आहेत. भारतात पबजी गेमवप बंदी आणल्यानंतर गेम प्रेमींमध्ये नाराजी दिसून आली. त्यामुळे आता बॅटलग्राउंट कधी लॉन्च केला जाणार याची प्रतीक्षा केली जात आहे. तर जाणून घ्या हा गेम कधी लॉन्च होणार आणि 18 वर्षाखालील मुलांसाठी कोणते नियम लागू करण्यात आले आहेत.

मोबाईल गेमिंग कंपनी क्राफ्टन नुसार, भारतात तयार करण्यात आलेला Battleground Mobile India हा PUBG मोबाईल गेमच्या ग्लोबल वर्जनपेक्षा अधिक वेगळा असणार आहे. यामध्ये पबजीच्या तुलनेत बहुतांश बदल करण्यात आले असून काही खास फिचर्स ही दिले आहेत. बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया मध्ये युजर्सला ईस्पोर्ट इकोस्टिटिम मिळणार आहे. ज्यामध्ये काही टूर्नामेंट आणि लीग्सचा समावेश असणार आहे. या नव्या गेममध्ये काही नवे आउटफिट्स आणि फिचर्स पहायला मिळणार आहेत. कंपनीने 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्यांसाठी सुद्धा एक खास योजना केली आहे.

कंपनीने घोषणा केली आहे की, नव्या गेम युजर्ससाठी तो फ्री असणार आहे. त्यांना फ्री-टू-प्ले चा अनुभव मिळणार आहे. पुढे असे म्हटले, बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया लॉन्चिंगनंतर येणाऱ्या काळात कंपनी भारतीय युजर्ससाठी काही गेम्स सुद्धा लॉन्च करणार आहे. जे सध्या भारतात उपलब्ध नाहीत. परंतु ग्लोबल स्तरावर उपलब्ध आहेत.(Battlegrounds Mobile India गेमची अधिकृत घोषणा; जाणून घ्या Battle Royale Game ची वैशिष्ट्यं)

गेल्या वर्षी युजर्सच्या प्रायव्हसीला धोका उद्भवल्यानंतर भारतात पबजी गेमवर बंदी घातली गेली. केंद्र सरकारने तयार केलेले सर्व नियमांचे पालन करत आता बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया लॉन्च केला जात आहे. कंपनी युजर्सचा डेटा भारतातच करणार आहे.

कंपनीनुसार, 18 वर्षाखालील मुलांना हा गेम खेळण्यासाठी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. मुलांना त्यासाठी आपल्या पालकांचा मोबाईल क्रमांक द्यावा लागणार आहे. Krafton ने बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया गेम भारतीय गेम प्रेमींसाठी खास प्रकारे तयार केला असून तो लवकरत लॉन्च केला जाणार आहे.