Apple (Apple / Twitter)

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भारतामध्ये ऍपल (Apple) ने आपले स्वतःचे पहिले रिटेल स्टोअर (Retail Store) उघडले. कंपनी केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी स्थानिक उत्पादनाला चालना देण्याची योजना आखत आहे. मुंबईच्या बीकेसी (BKC) भागात असलेल्या Jio World Drive Mall येथे Apple ने बुधवारी आपल्या भारतातील पहिल्या स्टोअरचे अनावरण केले. यासह कंपनीने अजून स्टोअर्स सुरु करणार असल्याची अधिकृत घोषणाही केली.

मुंबईच्या आयकॉनिक 'काली पीली' टॅक्सी कलेपासून प्रेरित असे हे ऍपलचे नवे स्टोअर आहे. स्टोअरच्या क्रिएटिव्हमध्ये ‘हॅलो मुंबई’ या क्लासिक ऍपल ग्रीटिंगसह लोकांचे स्वागत केले आहे. या ठिकाणी ग्राहकांना अॅपलची अनेक उत्पादने आणि सेवा उपलब्ध असतील. कंपनी या महिन्यात इंडिया रिटेल स्टोअरचे दरवाजे जनतेसाठी उघडण्यासाठी सज्ज आहे. कंपनी आपले पुढचे स्टोअर नवी दिल्लीत उघडण्याची शक्यता आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रातील या दिग्गज कंपनीने ब्राझील आणि भारतातील त्रैमासिक विक्रमांसह भारतीय बाजारपेठेमधून सर्वकालीन महसूल विक्रम प्रस्थापित केला आहे. ऍपलचे सीईओ टिम कुक यांनी अलीकडेच सांगितले की, भारतातील व्यवसायाबद्दल ते खुश आहेत. ते म्हणाले होते की, भारत हा त्यांच्यासाठी अतिशय उत्साहवर्धक बाजार आणि मुख्य केंद्र आहे. कंपनीने भारतात कोविडकाळात खरोखर चांगले काम केले. (हेही वाचा: Apple Layoffs: अॅपल कंपनीही करणार कर्मचारी कपात)

म्हणूनच कंपनीने देशात रिटेल स्टोअर सुरु करून गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. कंपनीने 2022 च्या हॉलिडे क्वार्टर (Q4) मध्ये भारतात 2 दशलक्ष आयफोन विकले. फ्लॅगशिप डिव्‍हाइससाठी 18 टक्‍के वाढ (तिमाही-दर-तिमाही) नोंदवली. 2022 मध्ये आयफोन्सचा भारतीय बाजारातील वाटा 5.5 टक्क्यांवर पोहोचला, जो 11 टक्क्यांनी वाढला आहे.