प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

दिग्गज टेक्नॉलॉजी कंपनी Apple ने गेल्या वर्षात iPad Pro लॉन्च केला होता. मात्र कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे लाइन-अप हा अपडेट करण्यात आला नव्हता. मात्र आता अशी बातमी आहे की, या महिन्यात दोन नवे iPad Pro टॅबलेट ग्लोबली लॉन्चिंग करण्याची तयारी केली जात आहे. Bloomberg यांच्या रिपोर्ट्सनुसार, अॅपल या महिन्यात दोन नवे iPad Pro टॅबलेट ग्लोबली लॉन्च करणार आहे. आयपॅड प्रो टॅबलेट चे टॉप-मॉजेल मध्ये मिनी एलईडी स्क्रिन दिली जाणार आहे. याची साइज 12.9 इंच असणार आहे. तर लहान मॉडेलमध्ये एलसीडी डिस्प्ले दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त अधिक माहिती समोर आलेली नाही.

या आगामी टॅबलेटमध्ये उत्तम परफॉर्मेन्ससाठी M1 Chip सारखे पॉवरफुल प्रोसेसर दिले गेले आहेत. मुख्य बाब अशी की मॅकबुक आणि मॅक मिनीसाठी ही चिप खासकरुन तयार केली जाते. लीक झालेल्या माहितीनुसार, iPad Pro टॅबलेटची किंमत प्रीमियम रेंज मध्ये ठेवली जाऊ शकते. यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा मिळू शकतो. पण अद्याप कंपनीकडून आयपॅड प्रो 2021 च्या लॉन्चिंग, किंमत किंवा फिचर्सबद्दल कोणतीही माहिती दिली गेली नाही आहे.(LG Wing स्मार्टफोन तब्बल 40 हजार रुपयांनी स्वत, मर्यादित कालावधीसाठी कंपनीने उपलब्ध केला स्टॉक)

तर iPad Pro 2020 टॅबलेटची भारतात सुरुवाती किंमत 71,900 रुपये आहे. आयपॅड प्रो 2020 iPadOS 13.4 ऑपरेटिंग सिस्टिमवर रन करणार आहे. याची खास गोष्ट म्हणजे यामध्ये अल्ट्रा वाइड कॅमेरा, स्टुडिओ क्वालिटी माइक आणि LiDAR स्कॅनर सपोर्टसह लॉन्च करण्यात आला आहे. जो डेप्थ टू डेप्थ सेंसिग टेक्नॉलॉडीवर काम करणार आहे. यामध्ये लिक्विड रेटिना डिस्प्ले आणि ऑग्मेंटेंड रियलिटी (AR) सारखे फिचर्स सुद्धा दिले गेले आहेत. यामध्ये ट्रॅकपॅड सपोर्ट आणि बॅकला 12MP+10MP चा रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे.