LG Wing स्मार्टफोन तब्बल 40 हजार रुपयांनी स्वत, मर्यादित कालावधीसाठी कंपनीने उपलब्ध केला स्टॉक
LG Wing Phone (Photo Credits-Twitter)

साउथ कोरियाची स्मार्टफोन निर्माती कंपनी LG च्या Wing फोनचा राहिला स्टॉक संपवण्यासाठी एक शानदार ऑफर आणली आहे. त्यानुसार कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीत घट करण्याचा निर्णय घेतला असून त्यात तब्बल 40 हजार रुपयांनी कपात केली आहे. एलजी विंगच्या किंमतीत 40 हजार रुपयांची घट केल्यानंतर युजर्सला हा स्मार्टफोन आता 29,990 रुपयांत खरेदी करण्यात येणार आहे. फोन फ्लिपकार्ट फ्लॅगशिप फेस्ट सेल मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला आहे. जो आजपासून सुरु झाला असून 15 एप्रिल पर्यंत राहणार आहे.

एलजी विंग स्मार्टफोन 69,999 रुपयांत लॉन्च करण्यात आला होता. जो आता 40 हजार रुपये डिस्काउंट देऊन विक्री केला जात आहे. त्यामुळे जर तुम्ही एलची विंग फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्याकडे उत्तम संधी आहे. कारण एलजी विंगचा लिमिटेड स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरियंटमध्ये येणार आहे. आता फोन Notify Me ऑप्शनसह विक्रीसाठी लिस्ट करण्यात आला आहे.(Amazon Gudi Padwa Offer 2021: गुढी पाडव्यानिमित्त अ‍ॅमेझॉन वर ग्राहसांठी स्पेशल ऑफर; इलेक्ट्रिक वस्तूंसह 'या' गोष्टींवर मिळणार भरघोस सूट)

या स्मार्टफोनमध्ये युजर्सला 6.8 इंचाचा फुलएचडी P-OLED प्रायमरी स्क्रिन मिळणार आहे. ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 20:5:9 आहे. तर प्रायमरी स्क्रिन फिरवून T शेपमध्ये कन्वर्ट करता येणार आहे. त्यानंतर फोनमध्ये 3.9 इंचाची सेंकेंडरी स्क्रिन दिसणार आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 765G 5G वर उतरवण्यात आला आहे. यामध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिला आहे. जो मायक्रोएसडीच्या माध्यमातून 2TB पर्यंत वाढवता येणार आहे. LG Wing मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. यामध्ये 64MP चा प्रायमरी सेंसर, 13MP चा अल्ट्रा वाइंड अॅंगल शूटर आणि 12MP चा तिसरा सेंसर मिळणार आहे. तर व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी यामध्ये युजर्सला 32MP चा पॉपअप कॅमेरा मिळणार आहे. अॅन्ड्रॉइड 10 ओएसवर आधारित या स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 4,000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. जो Qualcomm Quick Charge 4.0+ तंत्रज्ञान लैस आहे.