Apple iPhone SE 2020 ची आजपासून Flipkart वर विक्री सुरू; पहा या आयफोनची धमाकेदार फीचर्स, ऑफर्स आणि किंमत
Apple iPhone SE 2020 Available in India (Photo Credits: Apple India)

भारतामध्ये पहिल्यांदांच अ‍ॅपल (Apple) या लोकप्रिय मोबाईल कंपनीने त्यांचा iPhone SE 2020 हा मोबाईल विक्रीसाठी खुला केला आहे. फ्लिपकार्टवर (Flipkart)तो आता उपलब्ध आहे. आज (20 मे) दुपारी 12 वाजल्यापासून या आयाफोनची विक्री फ्लिपकार्टने सुरू केली आहे. भारतामध्ये मागील महिन्यात लॉन्च झालेला हा आयफोन SE 2020 ची किंमत 42,500 आहे. त्याच्या लॉन्चिंग नंतर आता हा विक्रीसाठी पहिल्यांदा बाजारात आला आहे. दरम्यान कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये ई कॉमर्स साईट्सला मागील काही दिवस नॉन ईसेंशिअल वस्तूची डिलेव्हरी देण्यास मज्जाव होता. मात्र आता रेड झोन सह इतर भागामध्येही ई रिटेलर्सना आता वस्तूंची विक्री आणि घरपोच सुविधा देण्यास मुभा आहे.

Apple iPhone SE 2020 चे फीचर्स

Apple iPhone SE 2020 या आयफोनमध्ये 4.7-inch रेटीना एचडी डिस्प्ले, A13 Bionic chipset,12MP रिअर कॅमेरा, 7MP फ्रंट कॅमेरा, iPhone 8's TouchID,डॉल्बी व्हिजन आणि HDR10 चा सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G VoLTE, वायफाय 802.11ax, वायफाय कॉलिंग, NFC, ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS देण्यात आलं आहे. अशी फीचर्स आहेत. याअफोनचं अजून एक आकर्षण म्हणजे हा डस्ट आणि वॉटर रेझिस्टंटदेखील आहे. फोनमध्ये वायरलेस चार्जिंगचाही पर्याय आहे. हा फोन 64GB, 128GB, आणि 256GB अशा तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तर लाल, पांढरा आणि काळ्या रंगामध्ये तो मिळू शकतो.

Apple iPhone SE 2020 किंमत आणि ऑफर्स

Apple iPhone SE 2020 ची फ्लिपकार्टवर दाखवण्यात आलेली किंमत ही 42,500 आहे. मात्र तुम्ही HDFC चे ग्राहक असाल तर काही ऑफरमुळे तुम्हांला सुमारे 3600 रूपयांची सूट मिळू शकते. त्यामुळे त्याची किंमत 38,900 पर्यंत खाली येईल. तर Axis Bank च्या ग्राहकांना 5% इंन्संट कॅशबॅक मिळनार आहे. तर HDFC debit card धारकांना 1500 इंन्संट कॅशबॅक मिळेल.

iPhone SE 2020 चा 128GB चा व्हेरिएंट 47,800 चा आहे. पण ऑफर्सचा फायदा घेऊन तो 44,200 पर्यंत घेता येऊ शकतो. तर 256GB चा व्हेरिएंट 3600 रूपयांच्या डिस्काऊंटनंतर 54,700 पर्यंत मिळेल.