Apple Days Sale 2021 (Photo Credits: Flipkart)

अॅपल (Apple) या सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीने अॅपल डेज सेल 2021 (Apple Days Sale 2021) फ्लिपकार्ट (Flipkart) वर सुरु केला आहे. या सेल अंतर्गत iPhone 12 Mini, iPhone 11 pro, iPhone Pro Max, iphone SE, Airpods, iPad यांच्यावर भरगोस सूट मिळणार आहे. एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) कार्डने खरेदी केल्यास 6000 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. यासोबतच EMI चा पर्याय देखील देण्यात येत आहे. हा सेल 14 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. (Apple TV+ आता युजर्सला 6 महिन्यापर्यंत मोफत पाहता येणार, जाणून घ्या अधिक)

आयफोन 12 च्या 64 जीबी वेरिएंट 79,900 रुपयांना फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. एचडीएफसी  बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास 6000 चा डिस्काऊंट तर डेबिट कार्ड वापरल्यास 1500 रुपयांची सूट मिळू शकते. (Apple कंपनीचा iPhone 11 खरेदी करण्याची संधी, अत्यंत कमी दिवसांसाठी दिली जातेय ही खास ऑफर)

 iPhone 12 Mini:

iPhone 12 Mini हा फोन 69900 रुपयांना उपलब्ध आहे. एचडीएफसी बँकेच्या ऑफर्ससोबतच यामध्ये एक्सचेंज ऑफरसुद्धा उपलब्ध आहे. तुमचा जुना फोन देऊन एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला 16500 रुपयांचा अधिक डिस्काऊंट मिळेल.

 iPhone 11:

आयफोन 11 64 जीबी वेरिएंट 49999 रुपयांना उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 5 टक्के डिस्काऊंट मिळू शकतो. यासोबतच तुम्ही नो-कॉस्ट ईएमआय किंवा स्टॅंडर्ड ईएमआयचा पर्याय देखील निवडू शकता. हा फोन घेताना सुद्धा एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला 16500 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो.

iPhone XR:

हा मोबाईल 41999 रुपयांना खरेदी करता येईल. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने खरेदी केल्यास 4000 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. तर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास 5 टक्के डिस्काऊंट मिळू शकतो.

Apple iPhone SE:

Apple iPhone SE हा मोबाईल 34999 रुपयांना फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डने खरेदी केल्यास 4000 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. तर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 5 टक्क्यांचा डिस्काऊंट मिळू शकतो.

यासोबतच आयफोन 12 प्रो मॅक्स. अॅपल आयमॅक्स आणि अॅपल वॉच सिरिज 3 यावर आकर्षक डिस्काऊंट उपलब्ध आहे.