Apple TV+ आता युजर्सला 6 महिन्यापर्यंत मोफत पाहता येणार, जाणून घ्या अधिक
Apple TV+ (Photo Credits-Twitter)

Apple TV+ चे फ्री ट्रायल ऑफर ही अधिक 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. दुसऱ्यांदा असे होत आहे की, अॅप्पल टीव्ही प्लसचे फ्री ट्रायल वाढवण्यात आले आहे. तर कंपनीकडून फ्री ऑफर ही सप्टेंबर 2019 मध्ये लॉन्च केली होती. त्यावेळी युजर्सला संपूर्ण वर्षभरासाठी मोफत सब्सक्रिप्शन ऑफर दिली गेली होती. त्यानंतर कंपनीने फेब्रुवारी 2021 पर्यंत ही ऑफर वाढवण्यात आली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा अॅप्पल टीव्ही प्लस फ्री ऑफर जुलै 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.(NetFlix ने नववर्षाच्या सुरुवातीला केली मोठी घोषणा! दर आठवड्याला प्रदर्शित करणार नवीन चित्रपट, वाचा सविस्तर)

Apple TV+ चे पेड सब्सक्रिप्शन ऑफर घेणाऱ्या युजर्सला पैसे परत दिले जाणार आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात अॅप्पलकडून Apple TV+ चे पेड सब्सक्राइबर्सला एक मेल पाठवत माहिती दिली होती. प्रत्येक महिन्याला त्यांना 4.99 डॉलर जवळजवळ 371 रुपयांचे शुल्क जानेवारी 2021 पर्यंत दिले जाणार आहे. तर फ्री ट्रायल वाढल्यानंतर याच पद्धतीने शुल्क भरले जाणार आहेत.(WhatsApp Privacy Policy FAQs Answered: व्हॉट्सअॅप मध्ये तुमचा डेटा खरंच सुरक्षित आहे का? काय सांगते अॅपची New Privacy Policy? जाणून घ्या

अॅप्पल टीव्ही प्लसच्या फ्री ट्रायलसाठी युजर्सला मेलच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्याचसोबत 99 रुपये प्रतिमहिन्यापासून जी 7 दिवसांच्या फ्री ट्रायल नंतर सुरु होते. Apple One Bundle सह सुरुवातीला 195 रुपये प्रतिमहिना देऊन एक्सेस करता येणार आहे. कंपनी अधिकाधिक युजर्सला याची सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे.