Netflix logo (Photo credit: twitter)

कोरोना महामारी आणि लॉकडाऊन च्या काळात OTT प्लॅटफॉर्म भलतेच फॉर्म मध्ये आले आहेत. त्याचा प्रभाव इतका चांगला पडला की अनेक मोठमोठ्या बॅनर्संनी हे आपले चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित केले. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता लोकांनी OTT प्लॅटफॉर्मला प्राधान्य दिले. त्यामुळे लोकांनीही घराबाहेर न पडता OTT द्वारा मनोरंजनाचा आनंद लुटला. यात NetFlix या OTT प्लॅटफॉर्म प्रचंड मनोरंजन केले. मात्र लॉकडाऊननंतर लोकांचा कल कमी होऊ नये नेटफ्लिक्स अनेक नवनवीन गोष्टी या करत आहेत. त्यात आता आणखी महत्त्वाची आणि मोठी घोषणा नेटफ्लिक्सने केली आहे.

नववर्षाच्या सुरुवातीला नेटफ्लिक्सने एक मोठी घोषणा केली आहे. ज्यानुसार, 2021 मध्ये नेटफ्लिक्सने प्रत्येक आठवड्यात दर्शकांना नवीन चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. म्हणजेच नेटफ्लिक्सच्या घोषणेतून या वर्षात नेटफ्लिक्स 70 नवे सिनेमे प्रदर्शित करणार असल्याची माहिती आहे.हेदेखील वाचा- WhatsApp Privacy Policy FAQs Answered: व्हॉट्सअॅप मध्ये तुमचा डेटा खरंच सुरक्षित आहे का? काय सांगते अॅपची New Privacy Policy? जाणून घ्या

नेटफ्लिक्सच्या चाहत्यांसाठी ही भलतीच आनंदाची बातमी आहे. नेटफ्लिक्सने रेड नोटिस' (Red Notice), 'आर्मी ऑफ द डेड' (Army Of The Dead), 'डोन्‍ट लुक अप' (Don't Look Up), 'टिक ट‍िक.. बूम' (Tik Tik Boom), 'द व्हाईट टाइगर' (The White Tiger), 'द गर्ल ऑन द ट्रेन' (The Girl On The Train) सारख्या बहुचर्चित सिनेमांचे ट्रेलर लाँच केले आहेत. त्यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता देखील आणखीनच वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्ल‍िक्‍स वर्षभरात प्रदर्शित करणार असलेल्या या 70 सिनेमांपैकी 52 इंग्रजी सिनेमे, 8 अ‍ॅनिमेटेड सिनेमे आणि 10 नॉन-इंग्रजी सिनेमांचा समावेश असणार आहे.