Apple कंपनीचा iPhone 11 खरेदी करण्याची संधी, अत्यंत कमी दिवसांसाठी दिली जातेय ही खास ऑफर
Apple iPhone (Photo Credits: IndiaiSotre)

भारतीय बाजारात आयफोनची वाढती युजर्ससंख्या लक्षात घेता Apple कंपनीने त्यांचा Apple Days सेल सुरु केला आहे. जो 14 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. या शानदार सेलमध्ये युजर्सला आयफोन ते अॅप्पल वॉच वर उत्तम डील आणि ऑफर मिळणार आहे. त्यामुळे अॅप्पल डेज च्या दरम्यान तुम्ही आयफोन 11 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. तर जाणून घ्या आयफोन 11 ची किंमत आणि त्यावर दिल्या जाणाऱ्या ऑफर बद्दल अधिक.(भारतात लाँच झाला Infinix Smart 5 स्मार्टफोन, 6000mAh बॅटरी असलेल्या या फोनची किंमत ऐकून तुम्हाला बसेल सुखद धक्का)

iphone11 ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या Apple Days सेलमध्ये फक्त 49,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. ऑफर बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 16,500 रुपयांचा एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. त्याचसोबत Axis बँकेकडून 5 टक्के कॅशबॅक आणि Bank Of Baroda कडून 10 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. या व्यतिरिक्त आयफोन11 हा प्रतिमहिना 8334 रुपये नो कॉस्ट EMI वर खरेदी करता येणार आहे.

स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास त्यासाठी 6.1 इंचाचा लिक्विट रेटिना डिस्प्ले दिला गेला आहे. यामध्ये Apple च्या नव्या A13 बायोनिक चिपचा वापर केला असून तो लेटेस्ट iOS 13 ऑपरेटिंग सिस्टिमसह लॉन्च केला आहे. तसेच कॅमेऱ्यासाठी यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे.(Samsung चा फोल्डेबल फोन Galaxy Z Flip3 आणि Galaxy Z Fold 3 लवकरचं लाँच होणार; जाणून घ्या खास स्पेसिफिकेशन्स)

फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरासह 12 मेगापिक्सलचा सेंकेंडरी अल्ट्रा वाइड सेंसर ही दिला आहे. यामध्ये f/2.4 चा अपर्चर असणारा सेंसरचा वापर केला असून ज्याचा फिल्ड ऑफ व्यू 120 डिग्री दिला आहे. फोनच्या रियर कॅमेऱ्यासाठी Smart HDR, इंप्रुव्ह नाइट मोड, इन्हांस्ड प्रोट्रेट मोड आणि 60fps सह 4K व्हिडि रेकॉर्डिंगची सुविधा मिळणार आहे.