स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने भारतात आपला जास्त बॅटरी लाईफ (Battery Life) असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. Infinix Smart 5 असे या स्मार्टफोनचे नाव असून याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यात 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 7,199 रुपये इतकी आहे. एवढ्या किंमतीत सर्वाधिक बॅटरी लाईफ देणारा हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे. बॅटरी लाईफ व्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या स्मार्टफोनची भारतीय बाजारात एन्ट्री होताच या अन्य ब्रँडच्या स्मार्टफोन्सला जबरदस्त टक्कर मिळणार आहे.
Infinix Smart 5 स्मार्टफोन ई कॉमर्स साइट Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. या स्मार्टफोनचा पहिला सेल 18 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 2GB रॅम+32GB स्टोरेज देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन 4 रंगात उपलब्ध होईल.हेदेखील वाचा- Vi ग्राहकांना कंपनीचा जोरदार झटका! देशातील 'या' चार सर्कल्समध्ये 2 Postpaid Plan झाले महाग
Meet the new #InfinixSMART5.
Time to go Bigger.Better.Faster with this smartphones ka master blaster.
First sale starts on 18th Feb, 12:00 noon on Flipkart.
Link: https://t.co/sp1tBfazsA#BiggerBetterFaster #SMART5 pic.twitter.com/cclVNWP3jX
— InfinixIndia (@InfinixIndia) February 11, 2021
Infinix Smart 5 च्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 6.82 इंचाची HD+ डिस्प्ले देण्यात आली आहे. या डिस्प्ले मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाईन देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G25 ऑक्टाकोर प्रोसेसरवर काम करतो. फोनमधील स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 256GB पर्यंत वाढवता येऊ शकते. हा स्मार्टफोन Android 10 Go Edition वर आधारित XOS 7 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
या स्मार्टफोनमध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर एक AI कॅमेरासुद्धा मिळतो. फोनच्या बॅक पॅनलमध्ये LED फ्लॅशसुद्धा देण्यात आले आहे. सेल्फीसाठी यात 8MP चा कॅमेरा दिला गेला आहे. फोनच्या मागील बाजूस रियर माउंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे. त्याचबरोबर हा फेस अनलॉक फीचर सुद्धा सपोर्ट करतो.
Infinix Smart 5 मध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 50 दिवसांपर्यंत चालते. यात 23 तासांचा नॉन-स्टॉप व्हिडिओ प्लेबॅक आणि 53 तासांचा 4G टॉक-टाईम मिळतो. त्याचबरोबर यात 155 तासांचा म्यूजिक प्लेबॅक आणि 23 तासांचा वेब सर्फिंगसुद्धा मिळतो. Infinix कंपनीचा हा स्मार्टफोन बाजारात येताच Realme, Samsung, Oppo, Vivo च्या स्मार्टफोन्सला जोरदार टक्कर देणार आहे.