Vodadone-Idea च्या ग्राहकांना कंपनीने एक जोरदार झटका दिला आहे. व्हिआय (Vi) ने आपल्या दोन पोस्टपेड प्लानच्या (Post Paid Plan) किंमतीत वाढ केली आहे. मात्र हे प्लान्स देशातील चार सर्कल्समध्येच हे प्लान्स महाग केले आहेत. Vi चा 598 आणि 699 प्लान महाग झाले असून यामुळे ग्राहकांचा खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. व्होडाफोन-आयडियाचे हे दोन प्लान्स महाराष्ट्र-गोवा (Maharashtra-Goa), चेन्नई (Chennai), तामिळनाडू (Tamilnadu) आणि कोलकाता (Kolkata) या चार सर्कलमध्ये महाग झाले आहेत. यामुळे येथील ग्राहकांना या प्लानसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
व्हिआय कंपनीने 598 आणि 699 हे दोन प्लान्स महाग केले आहेत. यापूर्वी हे दोन प्लॅन उत्तर प्रदेश सर्कलमध्ये महाग झाले होते. महाराष्ट्र-गोवा, चेन्नई, तामिळनाडू आणि कोलकाता या चार सर्कलमधील ग्राहकांना आता 598 रुपये आणि 699 रुपयांच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅन्ससाठी अनुक्रमे 649 रुपये आणि 799 रुपये मोजावे लागतील. म्हणजे 598 रुपयांचा प्लॅन 51 रुपये आणि 699 रुपयांचा प्लॅन 100 रुपयांनी महाग झाला आहे.हेदेखील वाचा- खुशखबर! VI चा 499 रुपयांचा नवा प्लान समोर अन्य टेलिकॉम कंपन्यांचे प्लान्स पडतील फिके
Vi च्या 649 आणि 799 रुपयाच्या पोस्टपेड प्लानमध्ये काय मिळतात सुविधा
Vi च्या 649 च्या प्लानमध्ये दोन कनेक्शन मिळतात. यातील प्रायमरी कनेक्शनवर 50 जीबी आणि दुसऱ्या नंबरवर 30 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एकूण 80 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनअंतर्गत प्रायमरी कनेक्शनवर 200 जीबी डेटा फॉरवर्ड करता येतो, तर दुसऱ्या नंबरवर 50 जीबी डेटा रोल ओव्हरचा पर्याय आहे. दोन्ही प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधाही मिळते.
तर 799 रुपयाच्या प्लानमध्ये तीन कनेक्शनचा पर्याय मिळतो. पहिल्या कनेक्शनवर 120 जीबी डेटा मिळतो, आणि अन्य दोन कनेक्शनवर 30-30 जीबी डेटा मिळतो. डेटा रोलओव्हरची सुविधा 649 रुपयांच्या फॅमिली प्लॅनप्रमाणेच आहे. तसेच, या प्लॅनमध्येही सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळते.