Amazon Prime Lite Membership: नवीन वर्षाच्या आधी अॅमेझॉन चाहत्यांसाठी मोठी बातमी; कंपनीने सबस्क्रिप्शनची किंमत केली कमी, घ्या जाणून
Amazon (PC - Pixabay)

Amazon Prime Lite Membership: नवीन वर्षापूर्वी अॅमेझॉन (Amazon) वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अॅमेझॉनने आता प्राइम लाइट सदस्यत्वाची (Amazon Prime Lite Membership) किंमत कमी केली आहे. अॅमेझॉनने प्राइम मेंबरशिपची किंमत तब्बल 200 रुपयांनी कमी केली आहे. सध्या, अॅमेझॉनने प्राइम सपोर्ट पेजवर प्राइम लाइट मेंबरशिप 799 साठी सूचीबद्ध केली आहे. याची सदस्यत्वा किंमत आधी 999 रुपये होती. मात्र इतर सदस्यत्व योजनांच्या किमती बदललेल्या नाहीत.

अॅमेझॉनने सबस्क्रिप्शनची केवळ किंमतच बदलली नाही, तर त्यासोबत मिळणारे फायदेही बदलले आहेत. प्राइम लाइट सदस्यत्वाचे अनेक फायदे आहेत. अॅमेझॉनने योजना अधिक परवडणारी बनवण्यासाठी काही बदल केले आहेत. उदाहरणार्थ, पूर्वी या प्लॅनमध्ये दोन दिवसांत मोफत डिलिव्हरी दिली जात होती. आता, योजनांमध्ये एक-दिवसीय डिलिव्हरी, दोन-दिवसीय डिलिव्हरी, नियोजित डिलिव्हरी आणि त्याच दिवशी डिलिव्हरी समाविष्ट आहे. मात्र यामध्ये प्राइम व्हिडिओ एचडी गुणवत्तेपुरता मर्यादित आहे व हे सबस्क्रिप्शन आता दोन ऐवजी एका डिव्हाइसला सपोर्ट करेल.

भारतात 650 दशलक्ष स्मार्टफोन वापरकर्ते आहेत, त्यापैकी 85 टक्के पेक्षा जास्त Android डिव्हाइस वापरतात. eMarketer नुसार, 2023 पर्यंत अॅमेझॉनचे अमेरिकेमध्ये अंदाजे 167.2 दशलक्ष अॅमेझॉन प्राइम मेंबर आहेत. 2020 मधील 146.1 दशलक्ष वरून त्यामध्ये 14.44% ची वाढ झाली आहे. दुसर्‍या स्त्रोतानुसार (CIRP),  सप्टेंबर 2023 मध्ये यूएस मधील 173 दशलक्ष ऍमेझॉन ग्राहकांकडे प्राइम मेंबरशिप होती. भारतामध्ये हा आकडा 59.8 दशलक्ष होता. (हेही वाचा: Modi Govt Generates 12 Lakh Employment: 'मेड इन इंडिया' मोबाईल फोन उत्पादनात 22 पट वाढ; 12 लाख लोकांना मिळाला रोजगार- Minister Ashwini Vaishnav)

दरम्यान, अॅमेझॉन हे भारतामधील आघाडीचे ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म आहे. घरांमध्ये वापरल्या जाणार्‍या जवळपास सर्वच वस्तू येथे उपलब्ध आहेत. सध्या अॅमेझॉन इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्मार्टफोन, फर्निचर, किराणा, सौंदर्य उत्पादनांवर भरघोस सूट देत आहे. ख्रिसमसचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जर तुम्हाला ख्रिसमसच्या दिवशी तुमचे घर सजवण्यासाठी वस्तू खरेदी करायच्या असतील तर सध्या तुम्ही अॅमेझॉनवर खरेदी करू शकता.