Amazon UPI | प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

Paytm, PhonePe, Amazon Pay, Mobikwik, Freecharge,Google Pay नंतर आता अमेरिकन ई कॉमर्स कंपनी Amazon ने भारतामध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI सेवा सुरू केली आहे. या सर्व्हिससाठी अ‍ॅमेझॉनला अ‍ॅक्सिस बॅंकेची(Axis Bank) साथ मिळाली आहे. या सुविधेचा फायदा मिळवण्यासाठी अ‍ॅमेझॉन अ‍ॅपवर सोय खुली करण्यात आली आहे.

काही युजर्सना त्यांच्या अ‍ॅमेझॉन अ‍ॅपवर युपीआयची सुविधा देण्यात आली आहे.

या सुविधेचा फायदा घेण्यासाठी काय कराल?

अमेझॉन युपीआयचा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला बॅंक खातं, Amazon UPI सोबत लिंक करावं लागेल. त्यानंतर तुमची पैसे पाठवण्याची आणि स्विकारण्याची सोय खुली होणार आहे. सध्या कंपनीने @apl हॅन्डल सुरू केले आहेत यामध्ये तुमचं बॅंक अकाऊंट Amazon UPI अ‍ॅप सोबत लिंक असेल तर mobilenumber@apl सारखे व्हर्च्युअल पेमेंट एड्रेस मिळेल. युपीआय सिस्टिमचं खास वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तुम्हांला पैशांचा व्यवहार करताना बॅंक अकाऊंट किंवा IFSC कोड न देता केवळ 'वर्चुअल पेमेंट एड्रेस' च्या माध्यमातून सुरक्षित व्यवहार करता येऊ शकतो.

भारतामध्ये UPI पेमेंटसाठी अनेक कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील स्पर्धा तगडी आहे. लवकरच व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय चॅट अ‍ॅपच्या मदतीने देखील व्यवहार करता येणार आहे. भविष्यात व्हॉट्सअ‍ॅपकडूनही UPI सेवा सुरू होण्याचा प्लॅन आहे.