Nokia 4.2 (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी नोकिया भारतातील अग्रगण्य कंपनींमधील एक आहे. सध्या बाजारात आलेल्या अन्य चीनी स्मार्टफोन्समुळे नोकियाची क्रेझ जरी कमी झाली असली तरी त्याचे चाहते अजूनही आहेत. अशा नोकिया प्रेमींसाठी आनंदाची बातमी. नोकिया कंपनीकडून त्यांच्या Nokia 4.2 वर मोठी सूट दिली आहे. ही सूट थोडी थोडकी नसून चक्क अर्ध्या किंमतीत हा स्मार्टफोन मिळत आहे. ही ऑफर ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर देण्यात आली आहे. जेथे आपल्याला हा स्मार्टफोन 6,999 रुपये किंमतीत मिळत आहे.

Nokia 4.2 स्मार्टफोनची मूळ किंमत 12, 999 रुपये इतकी आहे. मात्र अॅमेझॉनवरील ऑफरमध्ये हा स्मार्टफोन 6,999 रुपये किंमतीत मिळत आहे. Nokia 4.2 ची किंमत कमी झाली असल्याने ग्राहक याकडे आकर्षित होत आहेत. यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आहे. नोकिया 4.2 स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 9.0 पाय व्हर्जन आहे.

हेदेखील वाचा- शाओमी कंपनीचा Note 10 Pro लवकरच होणार लॉन्च; फिचर आणि किंमत घ्या जाणून

या स्मार्टफोनच्या स्टोरेजविषयी बोलायचे झाले तर, 3GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. ड्युअल सिम सपोर्ट असून 5.71 इंचाचा वॉटर ड्रॉप नॉच एचडी प्लस डिस्प्ले आहे.

या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 13 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला असून 8MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 3000mAh बॅटरी देण्यात असून फिंगप्रिंट सेंसर सुद्धा देण्यात आला आहे.

एमएचडी ग्लोबल या कंपनीने नुकताच नोकिया ब्रँडच्या अंतर्गत एक नवा फोन लाँच केला आहे. Nokia 110 (2019) असे या नव्या फीचर फोनचे नाव आहे.

या फोन मध्ये नोकियाचे अनेक प्रसिद्ध फीचर्स उपलब्ध आहेत. तसेच या नव्या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे या मोबाइलवर 27 तासांपर्यंत गाणी ऐकता येऊ शकणार आहेत. इतकंच नव्हे तर या फोनमध्ये एफएम रोडिओ आहेच पण त्यासोबतच सर्वांचा आवडता सापाचा गेमसुद्धा देण्यात येणार आहे. भारतात हा फोन खूपच कमी किंमतीत मिळणार असून तो बाजारात फक्त 1 हजार 599 रुपये इतकी असेल.