Call | Photo Credits: Pixabay.com

Mobile Number with 0 new rule: नव्या वर्षात लँडलाईनवरुन किंवा मोबाईल टू मोबाईल कॉलिंगची पद्धत बदलणार आहे. त्यानुसार मोबाईल क्रमांकवर कॉल करण्यापूर्वी युजर्सला त्यापूर्वी शून्य (0) लावाला लागणार आहे. दूरसंचार विभागाने या संबंधित असलेल्या TRAI चा प्रस्ताव स्विकारला आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना नवी मोबाईल नंबर सीरिज आणण्याची सुविधा मिळणार आहे. TRAI यांनी 29 मे 2020 मध्ये लँडलाईन मधून मोबाईल क्रमांकावर कॉलिंग करण्यासाठी क्रमांकापूर्वी शून्य लावण्यात यावा अशी शिफारस केली होती. त्यानंतर आता दूरसंचार विभागाने या शिफारसीचा स्विकार केला असून एक परिपत्रक जाहीर केले आहे.

परिपत्रकानुसार, लँन्डलाईनवरुन मोबाईलवर फोन करण्यासाठीची पद्धत TRAI कडून मान्य करण्यात आली आहे. यामध्ये असे ही म्हटले आहे की, दूरसंचार कंपन्यांना लँन्डलाईनच्या सर्व ग्राहकांना शून्य डायल करण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे. ही सुविधा आपल्या क्षेत्राबाहेर कॉलिंग करण्यासाठी उपलब्ध आहे. दूरसंचार कंपन्यांना ही नवी सुविधा अंमलात आणण्यासाठी 1 जानेवारी पर्यंतचा कालावधी दिला आहे.(Google Pay द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी भारतीय युजर्संना कोणतेही शुल्क नाही; Google India ची माहिती)

ट्रायकडून काही दिवसांपूर्वीच सरकारला मोबाईल क्रमांकात बदलाव करण्यासाठी काही प्रस्ताव दिले होते. यामध्ये नवा नॅशनल नंबरिंग प्लॅनचा समावेश होता. त्याचसोबत TRAI कडून डॉन्गल्ससाठी एका वेगळ्या मोबाईल क्रमांकाची सीरिज जारी करण्याची सिफारीश केली होती. ज्यामध्ये 10 ऐवजी 13 नंबर असावेत असे सुचवले होते.(फोन हरवल्यास किंवा खराब झाल्यास Important Contacts पुन्हा मिळवण्यासाठी काळजी करु नका, 'या' पद्धतीचा वापर करा)

भारतात मोबाईल युजर्सची वाढती संख्या पाहता नव्या नव्या मोबाईल क्रमांकाची गरज भासते. यासाठी ट्रायकडून मोबाईल क्रमांक 10 डिजिट ऐवजी 11 डिजिट करण्यात यावी अशी गेल्या काही काळापासून मागणी केली जात होती. अशी अपेक्षा आहे की, मोबाईल नंबरची सीरिज 10 ऐवजी 11 अंकी करण्याबद्दल कोटींच्या संख्येने नवे मोबाईल क्रमांक तयार केले जातील.