फोन हरवल्यास किंवा खराब झाल्यास Important Contacts पुन्हा मिळवण्यासाठी काळजी करु नका, 'या' पद्धतीचा वापर करा
iPhone | (Photo Credits: PixaBay)

जर तुम्ही एखादा नवा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर त्यामध्ये सिम चेंज करणार असल्यास तुमच्या जुन्या फोन मधील कॉन्टॅक्स काही वेळेस डिलिट झाल्याची समस्या उद्भवते. ही समस्या तुमचा फोन खराब किंवा हरवल्यास तर अधिक होते. परंतु तुम्ही काळजी करु नका. कारण तुमचे फोन क्रमांक तुम्हाला परत मिळू शकतात. मात्र त्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आणि मार्गाचा वापर करावा लागणार आहे.मोबाईल मधील महत्वाचे क्रमांक पुन्हा मिळवण्यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये दिलेल्या ऑप्शनचा वापर करावा लागणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला फोन क्रमांक पुन्हा रिकव्हर करु शकता. मात्र लक्षात असू द्या की, तुमच्या फोनमध्ये Backup चा ऑप्शन On असू द्या.

कॉन्टॅक क्रमांक रिकव्हर करण्यासाठी युजर्सचे Gmail अकाउंट असणे महत्वाचे आहे. मात्र जर तुमचे Gmail अकाउंट नसल्यास तो सर्वात प्रथम Gmail अकाउंट सुरु करा. कारण भविष्यात तुम्हाला कॉन्टॅक क्रमांक पुन्हा मिळवण्यास मदत होईल. परंतु तुमचे जी मेल अकाउंट असल्यास पुढील स्टेप्स फॉलो करा.(तुमचे Gmail अकाउंट 1 जून 2021 नंतर बंद होणार? Google च्या 'या' नवीन पॉलिसीबद्दल घ्या जाणून)

- सर्वात प्रथम तुमच्या ID वरुन Log In करा.

-त्यानंतर लेफ्ट साइड Google च्या खाली Gmail दिसणार आहे. तेथेच असलेल्या Arrow वर क्लिक करा.

-क्लिक केल्यास तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसून येतील. यामध्ये Gmail, Contacts आणि Tasks यांचा समावेश असेल. यामधील Contacts वर क्लिक करा.

-क्लिक केल्यानंतर एक नवे पेज सुरु होईल. या पेजवर तुम्हाला सर्व क्रमांक दिसून येतील. तुम्ही हे क्रमांक Backup करण्यासह डिलिट सुद्धा करु शकतात.

-ही प्रोसेस तेव्हाच पूर्ण होईल ज्यावेळेस तुमचे फोन Gmail कॉन्टॅक सोबत लिंक होणार आहे.

तसेच फोनमध्ये Gmail कॉन्टॅक्स सोबत लिंक करण्यासाठी प्रथम सेटिंग्स मध्ये जा. तेथे गेल्यानंतर Contact Backup ऑन करा. Settings मध्ये Account and Sync ऑप्शन निवडून Gmail अकाउंट अॅक्टिव्हेट करु शकता. त्यानंतर तुमच्या फोनमधील सर्व क्रमांक ऑटोमेटिक पद्धतीने जीमेल वर बॅकअप होणार आहेत.