तुमचे Gmail अकाउंट 1 जून 2021 नंतर बंद होणार? Google च्या 'या' नवीन पॉलिसीबद्दल घ्या जाणून
Gmail | (File Photo)

Gmail Latest Update: जीमेल वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली असून गुगलच्या नवीन पॉलिसीनुसार तुमचे अकाउंट बंद होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, जीमेल, गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटोज वापरले नाही तर, 1 जून 2021 नंतर ही सर्व अकाऊंट बंद केली जातील. जीमेल, गुगल ड्राईव्ह आणि गुगल फोटोचे अकांउट 2 वर्षांसाठी निष्क्रिय राहिल्यास गुगल या सर्व अकाउंटमधून तुमचा कंटेंट डिलिट करेल आणि ही खाती बंद करणार आहेत. यामुळे गुगलमध्ये आपल्या फाईल्स आणि इतर महत्वाची माहिती ठेवणाऱ्या वापरकर्त्यांसाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुगलने पुढच्या वर्षी जून महिन्यापासून ही पॉलिसी राबवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या पॉलिसीनुसार, वापरकर्ते जीमेल, गुगल ड्राईव्ह आणि गुगल फोटोजचे अकाउंट दोन वर्षांसाठी निष्क्रिय राहिल्यास गुगल या सर्व अकाउंटमधून तुमचा कंटेंट डिलिट करून ही खाती बंद करणार आहे. याशिवाय, जर तुमच्या अकाउंटमधील कंटेंट 2 वर्षांचे स्टोरेज मर्यादेपेक्षा जास्त असेल तर, गुगल तुमचा कंटेंट जीमेल, ड्राइव्ह आणि फोटोजमधून डिलिट होण्याची शक्यता आहे. तुमचे अकांउट अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी वापरकर्त्यांना वेळोवेळी जीमेल, ड्राइव्ह आणि फोटोवर जाण्याची गरज आहे. ज्यामुळे तुमचे अकांउट निष्क्रिय होणार नाही. हे देखील वाचा- Vodafone Idea च्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये युजर्सला मिळणार अनलिमिटेड डेटा आणि Amazon Prime चे फ्री सब्सक्रिप्शन

महत्वाचे म्हणजे, वापरकर्ते गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटोजवर 15 जीबी डेटा मोफत सेव्ह करू शकतात. परंतु, वापरकर्त्यांनी 15 जीबीची मर्यादा ओलांडली तर, त्यांना नव्या पॉलिसीनुसार पैसे मोजावे लागणार आहे. वापरकर्त्यांना 100 जीबी स्टोरेज सुविधा मिळवण्यासाठी प्रत्येक महिन्याला 130 रुपये आणि एका वर्षासाठी 1300 रुपये द्यावे लागणार आहे. जर वापरकर्त्यांनी 200 जीबी स्टोरेज प्लॅन घेतला तर, त्यांच्याकडून दर महिन्याला 210 रुपये आकरले जाणार आहेत. त्याचबरोबर 2 टीबी आणि 10 टीबी स्टोरेजसाठी वापरकर्त्यांना दर महिन्याला 650 तर, एका वर्षाला 3 हजार 250 रुपये द्यावे लागणार आहेत.