Vodafone Idea च्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये युजर्सला मिळणार अनलिमिटेड डेटा आणि  Amazon Prime चे फ्री सब्सक्रिप्शन
Idea And Vodaphone (Photo Credit: TheIndianWire)

जर तुम्ही वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) युजर्स आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने 699 रुपयांचा पोस्टपेड रिचार्जसोबत आता Amazon Prime चे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा उपलब्ध करुन दिले आहे. याचा लाभ युजर्सला एका वर्षापर्यंत घेता येणार आहे. या व्यतिरिक्त युजर्सला रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाची सुविधा सुद्धा दिली जाणार आहे. कंपनीने हा प्लॅन जुलै महिन्यातच लॉन्च केला होता. मात्र आता नव्या बेनिफिट्सनुसार, त्यात अन्य काही सुविधा सुद्धा ग्राहकांना दिल्या जाणार आहेत.

Vodafone Idea च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला एका वर्षापर्यंत अॅमेझॉन प्राइमचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे. याची किंमत खरी 999 रुपये आहे. मात्र तुम्हाला हा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर अॅमेझॉनचे प्राइमचे सब्सक्रिप्शनचा मोफत लाभ घेता येणार आहे.(Jio Best Recharge Plans: जिओ कंपनीचे 200 रुपयांहून कमी किंमतीतील 'या' धमाकेदार प्लॅन्सबद्दल येथे अधिक जाणून घ्या)

या प्लॅनअंतर्गत युजर्सला काही खास बेनिफिट्स सुद्धा दिले जात आहेत. यामध्ये युजर्सला देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंगसाठी अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंग कॉल करता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. ऐवढेच नाही तर जर तुम्ही इंटरनेटचा अधिक वापर करत असल्यास हा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे. युजर्सला या प्लॅनमध्ये प्रत्येक महिन्याला 100 फ्री SMS ही दिले जाणार आहेत.(Airtel कडून यूजर्संना Hotstar VIP चे मोफत सबस्क्रिप्शन; जाणून घ्या खास रिचार्ज प्लॅन)

दरम्यान, जिओ कंपनीच्या Postpaid Plus प्लॅन अंतर्गत उपलब्ध 599 रुपयांचा प्लॅन हा वोडाफोन आयडियाच्या 699 रुपयांच्या प्लॅनला टक्कर देऊ शकते. कारण जिओच्या या प्लॅनची किंमत कमी आहे. त्याचसोबत यामध्ये Netflix, amazon Prime आणि Disney+Hotsatar VIP सारखे ओटीटी अॅपचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. तसेच युजर्सला 100GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा सुद्धा मिळणार आहे.