Jio Best Recharge Plans: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ कडून विविध प्रकारचे प्री-पेड प्लॅन ऑफर केले जात आहेत. जे हायस्पीड इंटरनेट डेटा आणि मोफत कॉलिंगची सुविधा देतात. मात्र आम्ही तुम्हाला आज काही निवडक आणि खिशाला परवडतील अशा काही रिचार्ज प्लॅन्सबद्दल अधिक माहिती देणार आहोत. या रिचार्ज प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवसांची असून जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी मोफत अनलिमिटेड मिनिट्स दिले जातात. पण अन्य नेटवर्क्सवर कॉलिंग करण्यासाठी कमीतकमी 1000 मिनिट्स मिळतात. त्याचसोबत प्रतिदिनी 100 मोफत SMS ची सुविधा दिली जात आहे.
तर जिओ कंपनीचा 75 रुपयांच्या रिजार्च प्लॅनमध्ये युजर्सला 3G डेटासह Jio नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच अन्य नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी 500 मिनिट्स दिले जाणार आहेत. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.(Mobile Recharge: 300 रुपयांहून कमी किंमती मधील 'या' शानदार Prepaid Plans बद्दल येथे अधिक जाणून घ्या)
जिओ कंपनीचा 125 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14GB डेटा दिला जाणार आहे. त्याचसोबत प्लॅनवर जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी मोफत अनलिमिटेड मिनिट्स दिले जाणार आहेत. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 500 मिनिट्स मिळणार आहेत. तसेच 300 फ्री एसएमएस ही प्रतिदिनी पाठवता येणार आहेत. त्याचसोबत Jio अॅपचे सब्सक्रिप्शन ही दिले जाणार आहे.
जिओ कंपनीचा 185 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनमध्ये युजर्सला 28GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवसांची असून जिओ नेटवर्कवर मोफत कॉलिंग करता येणार आहे. मात्र अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 500 मिनिट्स दिले जाणार आहेत. 300 फ्री SMS सह जिओ अॅपचे सब्सक्रिप्शन सुद्धा मिळणार आहे. (Airtel कडून यूजर्संना Hotstar VIP चे मोफत सबस्क्रिप्शन; जाणून घ्या खास रिचार्ज प्लॅन)
रिलायन्स कंपनीच्या जिओचा 199 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या वॅलिडिटीसह 42GB डेटा दिला जाणार आहे. म्हणजेच प्रतिदिनी 1.5GB डेटा मिळणार आहे. या व्यतिरिक्त जिओ टू जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. त्याचसोबत अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिट्स दिले जाणार आहेत. तसेच युजर्सला प्रतिदिनी 100 फ्री SMS आणि जिओ अॅपचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे.