स्मार्टफोन (Photo Credits: Pixabay)

भारतीय टेलिकॉम बाजारात Jio, Airel आणि Vodafone-Idea यांचे हजारो प्रीपेड प्लॅन उपलब्ध आहेत. याच कारणास्तव युजर्सला योग्य रिचार्ज प्लॅन निवडण्यासाठी काही प्रमाणात अडथळा येत आहे. याच कारणास्तव आज आम्ही तुम्हाला या तिन्ही कंपन्यांचे काही निवडक प्रीपेड प्लॅनबद्दल अधिक माहिती देणार आहोत. खासियत म्हणजे सर्व प्रीपेड प्लॅन 300 रुपयांहून कमी किंमतीत उपलब्ध आहेत. या प्लॅन्समध्ये हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुद्धा सेवा दिली जात आहे.(Portronics ने भारतात लॉन्च केले Bluetooth Receiver आणि Transmitter Adaptor, जाणून घ्या खासियत)

रिलायन्स जिओ कंपनीचा 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला प्रतिदिन 2GB डेटासह 100 एसएमएस सुद्धा मिळणार आहेत. त्याचसोबत कंपनी युजर्सला कॉलिंगसाठी 1 हजाक एफयुपी मिनिट्स देणार आहे. दरम्यान, जिओ टू जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. अन्य बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास या प्लॅनमध्ये जिओ अॅप सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे. या पॅकची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे.

तसेच एअरटेल कंपनीचा प्लॅन हा सुद्धा 249 रुपयांचा असून युजर्सला प्रतिदिनी 100SMS सह 1.5GB डेटा मिळणार आहे. तसेच युजर्सला अन्य नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करण्याची सुविधा मिळणार आहे. या व्यतिरिक्त युजर्सला एअरटेल एक्सट्रिम आणि विंक म्युझिक अॅपचे सब्सक्रिप्शन ही देणार आहे. हा पॅक 28 दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो.(Vodafone Idea ची बंपर ऑफर; या स्पेशल रिचार्जवर 56 दिवसांसाठी मिळणार 100 GB डेटा)

एअरटेल कंपनीचा अजून एक प्लॅन असून त्याची किंमत 279 रुपये आहे. या प्लॅनची वैधता ही 28 दिवसांची आहे. मात्र यामध्ये एचडीएफसी बँकेकडून चार लाख रुपयांचा जीवन विमा दिला जाणार आहे. तसेच प्रतिदिन 1.5GB डेटासह 100SMS ही देणार आहे. अन्य बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये सुद्धा 249 रुपयांच्या रिचार्जसारख्या सुविधांचा युजर्सला लाभ घेता येणार आहे.

तर वोडाफोन कंपनीचा 299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा डबल डेटा ऑफरसह येणार आहे. युजर्सला या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटासह अतिरिक्त 2GB डेटा ही दिला जाणार आहे. त्याचसोबत युजर्सला अन्य नेटवर्कवर कॉलिंग ही करता येणार आहे. तसेच कंपनी युजर्सला या प्लॅनमध्ये वोडाफोन प्ले आणि G5 प्रीमियम अॅपचे सब्सक्रिप्शन मोफत देणार आहे. या पॅकची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे.