Vodafone Idea Merger Representational Asset (Photo Credit: TheIndianWire)

व्होडाफोन-आयडियाने (Vodafone Idea) सर्वात चांगले डेटा प्लॅन लाँच केले आहेत. जे कोरोना संकट काळात घरातून काम करणाऱ्यांसाठी, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओसह इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत. व्होडाफोन-आयडियाने 351 रुपयांच्या प्रीपेड डेटा रिचार्जवर आपण 56 दिवसांसाठी 100 जीबी डेटाचा लाभ घेऊ शकता. या रिचार्ज बद्दल खास गोष्ट म्हणजे, तुम्ही हा 4G प्लॅन पूर्ण 56 दिवसांत किंवा अवघ्या 10 दिवसात संपवू शकता. म्हणजेचं आपल्या गरजेनुसार आपण या रिचार्ज योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे हा रिचार्ज क्रिकेट, चित्रपट आणि घरातून काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरू शकतो. कंपनीने हा प्रीपेड रिचार्ज मोबाइल, संगणक किंवा लॅपटॉपवर तासंतास काम करणाऱ्यासाठी, चित्रपट किंवा क्रिकेट पाहणाऱ्यांसाठी आणि ऑनलाईन गेम्स खेळणार्‍यासाठी आणला आहे. काही ग्राहक एका दिवसात एक किंवा दोन जीबी डेटा मर्यादेसह एखादा रिचार्ज करतात. मात्र, त्यांच्यासाठी 351 रुपयांचा व्होडाफोन-आयडिया अर्थात व्हीआयच्या डेटा रिचार्ज लाभदायी ठरू शकतो. (हेही वाचा -JioPages Browser: जिओने लॉन्च केले स्वदेशी मोबाईल वेब ब्राउझर; जाणून घ्या याची खासियत आणि वैशिष्ठ्ये)

दरम्यान, आजकाल क्रिकेट आणि वेब सिरीजचा ट्रेंड सुरू आहे. लोक तासन्तास इंटरनेटचा वापर करत आहेत. त्यामुळे अशा ग्राहकांसाठी व्होडाफोन-आयडियाचा हा प्रीपेड रिचार्ज महत्त्वपूर्ण ठरू शकतो. याच ते कोणत्याही मर्यादेशिवाय डेटा वापरू शकतात. याशिवाय एअरटेल आणि जिओने 349 रुपयांचा प्रीपेड डेटा रिचार्ज प्लॅन देखील आणला आहे. या अनेक आकर्षक ऑफर्स आहेत.

एअरटेलच्या 349 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर, वापरकर्त्याला 28 दिवसांसाठी प्रतिदिन 2GB नुसार 56 GB डेटा मिळतो. यासह तुम्हाला दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधादेखील मिळते. या रिचार्ज योजनेसह एअरटेल रिचार्जवर अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, एअरटेल एक्सट्रीम आणि विंक म्युझिकचा लाभ एका महिन्यासाठी मिळतो. याशिवाय 349 रुपयांच्या जिओ रिचार्ज योजनेवर तुम्हाला 28 दिवसांसाठी दररोज 3GB जीबी डेटा, इतर नेटवर्क्सवर 100 मिनिटे आणि 100 मेसेजेसचा लाभ मिळेल.