Airtel कंपनीकडून ग्राहकांना झटका, टॅरिफ प्लॅनच्या दरात पुन्हा वाढ
Airtel (Photo Credits: File Image)

नवं वर्षाच्या पहिल्याच दिवशी एअरटेल कंपनीने त्यांच्या ग्राहकांना झटका दिला आहे. कारण डिसेंबर महिन्यात कंपनीने त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या दरात बदल केल्यानंतर आता पुन्हा दर वाढवले आहेत. त्यामुळे एअरटेल ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. आजपासून प्लॅनचे नवे दर लागू होणार आहेत. एवढेच नाही तर तुम्हाला एअरेट कंपनीसोबत तुमचे मोबाईल कनेक्शन सुरु ठेवण्यासाठी ग्राहकांना 45 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. तर या प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवसांची असणार आहे. यापूर्वी हा प्लॅन 35 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला होता.

एअरटेल ग्राहकांना कॉलिंगसाठी प्रति मिनिटांसाठी 1.40 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच SMS च्या दरात सुद्धा वाढ करण्यात आली आहे. एसएमएससाठी ग्राहकाला आता 1 रुपयांऐवजी 1.5 रुपये द्यावे लागणार आहेत. तर डिसेंबर महिन्यात कंपनीने त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ केली होती.(Reliance Jio, एअरटेल, वोडाफोन कंपन्यांचे प्रत्येक महिन्यासाठी 84GB पर्यंत डेटा असणारे बेस्ट प्लॅन जाणून घ्या)

 मात्र कंपनीने टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केल्यानंतर ग्राहकांना शिखाला परवडणाऱ्या किंमतीत काही प्लॅन उपलब्ध करुन दिले होते. त्यामधील एअरटेल कंपनीचा 398 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांची वॅलिडिटी असणाऱ्या या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा ऑफर केला जात आहे. प्लॅनमध्ये मिळणारे अन्य बेनिफिट्स बाबत बोलायचे झाल्यास अनलिमिटेड लोकल, एसडी आणि रोमिंग कॉलिंगसह 100 फ्री एसएमएस पाठवता येणार आहेत.