Reliance Jio, Airtel, Vodafone, Idea | (Photo courtesy: archived, edited images)

टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनचे दर नुकतेच वाढवले आहेत. यापूर्वीपेक्षा आताच्या प्लॅनच्या किंमती 40 टक्क्यांनी अधिक केल्या आहेत. त्याचसोबत प्लॅनसोबत मिळणाऱ्या इंटरनेट सेवा, अनलिमिटेड कॉलिंग यांच्यामध्ये सुद्धा कपात केली आहे. मात्र सध्या नवे दर लागू केल्यानंतर एअरटेल, वोडाफोन-आयडिया आणि रिलायन्स जिओ यांनी त्यांच्या प्लॅन्समध्ये पुन्हा एकदा बदल केला आहे. त्यानुसार ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सेवा परत सुरु केली आहे. कॉलिंग प्लॅनच्या व्यतिरिक्त डेटा बेनिफिट्समध्ये सुद्धा काही बदल करण्यात आले आहेत. जर तुम्ही कॉलिंग पेक्षा डेटाचा वापर करत असाल तर आम्ही तुम्हाला काही बेस्ट प्लॅनबाबत सांगणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला महिन्याभराठी 84GB पर्यंत डेटा मिळू शकतो.

>>रिलायन्स जिओचा 349 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये युजर्सला प्रत्येक दिवसासाठी 3GB डेटा मिळणार आहे. या 28 दिवसांच्या प्लॅनध्ये एकुण 28GB डेटा असून त्याच्या सोबत 100 फ्री एसएमएस सुद्धा पाठवता येणार आहेत. प्लॅन खरेदी करणाऱ्या युजर्सला जिओ-टू-जिओ फ्री अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. तर दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1000 FUP मिनिट्स मिळणार आहेत.

>>एअरटेल कंपनीचा 398 रुपयांचा प्लॅन

28 दिवसांची वॅलिडिटी असणाऱ्या या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा ऑफर केला जात आहे. प्लॅनमध्ये मिळणारे अन्य बेनिफिट्स बाबत बोलायचे झाल्यास अनलिमिटेड लोकल, एसडी आणि रोमिंग कॉलिंगसह 100 फ्री एसएमएस पाठवता येणार आहेत.

>>वोडाफोन

वोडाफोन कंपनीने अद्याप 3GB डेटा देणारा कोणताही प्लॅन लॉन्च केला नाही आहे. मात्र कंपनीचे असे काही प्रीपेड प्लॅन्स आहेत ज्यामध्ये अनलिमिडेट फ्री कॉलिंगसह दिवसाला 2GB डेटा ऑफर केला जातो. यामध्ये 299,449 आणि 699 रुपयांचा प्लॅनचा उपलब्ध आहेत.(टेलिकॉम कंपन्यांचे 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट प्रीपेड प्लॅन, जाणून घ्या)

 त्याचसोबत एअरटेल कंपनीचा 148 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 28 दिवसांची वॅलिडिटी मिळणार आहे. तसेच एकूण 2 जीबी डेटा आणि 1000 एफयुपी मिनिट्स (अन्य नेटवर्कवर कॉलिंग) मिळणार आहेत. तसेच वोडाफोनचा 149 रुपयांच्या प्लॅन हा सर्वात स्वस्त असून ग्राहकाला 2 जीबी डेटा आणि 1000 एफयुपी मिनिट्स मिळणार आहेत. रिलायन्स जिओचा 129 रुपयांच्या प्लॅन घेतल्यास यामध्ये 2 जीबी डेटा आणि 1000 एफयुपी मिनिट्स देण्यात येणार आहेत. त्याचसोबत एअरटेलचा 148 आणि वोडाफोनचा 149 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनपेक्षा ग्राहकांना जिओचा हा प्लॅन घेतल्यास 15 टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे.