 
                                                                 दूरसंचार (Telecommunication) क्षेत्रातील वाढत जाणाऱ्या स्पर्धेला पाहता प्रत्येकच कंपनी आपल्या ग्राहकांसाठी प्लॅन्स व सुविधा आणून अधिक लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असते. या स्पर्धेतील जुनं नाव म्हणजे Airtel कंपनी. प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आता एअरटेलने सुद्धा आपल्या प्रीपेड प्लॅन (Airtel Prepaid Plan) मध्ये बदल आणायला सुरुवात केली आहे. त्यानुसार एअरटेलनं आता वर्षभरासाठी असलेल्या 1699 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये बदल केला आहे. हा प्लान घेतल्यास ग्राहकांना आधीच्या तुलनेत तब्बल 40 टक्के अधिक फायदा मिळणार आहे.(Airtel च्या प्रीपेड ग्राहकांनाही मिळणार Amazon Prime चे फ्री सब्सक्रिप्शन)
काय आहे या प्लॅन मधील बदल?
एअरटेलच्या 1699 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते. तसंच याआधी दररोज 1 जीबी डेटा देण्यात येत होता. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, या प्लानमध्ये बदल केल्यानंतर ग्राहकांना दररोज 1.4 जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच ग्राहकांना आधीच्या तुलनेत दरदिवशी 40 टक्के अधिक डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना आधी वर्षभरात 365 जीबी डेटा मिळत होता. आता त्यात वाढ करून 511 जीबी करण्यात आला आहे. हा प्लान घेणाऱ्यांना वर्षभरात 146 जीबी अधिक डेटा मिळणार आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
