Airtel (Photo Credits: File Photo)

Airtel Cashback Offer: टेलिकॉम कंपनी Airtel ने फेस्टिव्हल सीजन दरम्यान ग्राहकांसाठी शानदार ऑफर आणली आहे. त्यानुसार ग्राहकांना नवा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 6 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे. खरंतर एअरटेलकडून यासाठी 'मेरा पहिला' स्मार्टफोन कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार 150 हून अधिक ग्राहकांना कॅशबॅक मिळणार आहे. एअरटेल अशा ग्राहकांना 6 हजार रुपयांचा कॅशबॅक देणार आहे जे प्रमुख ब्रँन्ड मधून जवळजवळ 12 हजार रुपयांपर्यंतच्या किंमतीचा स्मार्टफोन खरेदी करणार आहेत.(Apple Watch Series 7 च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात; पहा काय आहे खासियत आणि किंमत)

ग्राहकांनी 6 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळवण्यासाठी त्यांना 36 महिन्यापर्यंत सातत्याने 249 रुपयांचा किंवा त्याहून अधिक एअरटेल प्रीपेड पॅकसह रिचार्ज करावा लागणार आहे. ग्राहकांना कॅशबॅक दोन भागात मिळणार आहे. पहिला हप्ता 2 हजार रुपये 18 महिन्यानंतर उर्वरित रक्कम 4 हजार रुपये 36 महिन्यानंतर मिळणार आहे. म्हणजेच जर एखादा ग्राहक 6 हजार रुपयांच्या किंमतीच्या स्मार्टफोनचा ऑप्शन निवडत असेल तर त्याला उत्तम स्मार्टफोनचा अनुभव मिळण्यासह प्रत्येक प्रीपेड रिचार्जसह अधिक डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा सुद्धा लाभ घेता येणार आहे. 36 महिन्याच्या अंतापर्यंत ग्राहकांना पूर्ण रुपात डिजिटल आधारावर कनेक्टेड सुद्धा राहणार आहे. त्याला आपले पूर्ण 6 हजार रुपये ही मिळणार आहेत.(Twitter युजर्ससाठी नवे Feature; पोस्टपूर्वी मिळणार महत्त्वाचा इशारा)

दरम्यान, या प्रोग्रामचा हिस्सा असलेल्या ग्राहकाला स्मार्टफोनची स्क्रीन तुटल्यानंतर 'सर्व्हायफाय' द्वारे मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा देखील मिळेल. या ऑफरमुळे ग्राहकाला 4800 रुपयांचा अतिरिक्त लाभही मिळेल. (12,000 रुपये किंमतीचा स्मार्टफोन स्क्रीन बदलण्याची अंदाजे किंमत). रिचार्जच्या 90 दिवसांच्या कालावधीत ग्राहक एअरटेल थँक्स अॅपद्वारे मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटसाठी पात्र असेल. अमर्यादित कॉलिंग आणि अधिक डेटा फायद्यांसह, ग्राहक त्यांच्या प्रीपेड रिचार्जसह एअरटेल थँक्स अॅपच्या अनेक वैशिष्ट्यांचा आनंद घेऊ शकतील. यामध्ये मोफत Wynk म्युझिक सबस्क्रिप्शन आणि Amazonमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशनची 30 दिवसांचा ट्रायलचा समावेश आहे.