Twitter युजर्ससाठी नवे Feature; पोस्टपूर्वी मिळणार महत्त्वाचा इशारा
Twitter Down | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर ( (Micro Blogging Site Twitter) आयओएस आणि अँड्रॉइड (Android) वर एक नवे फीचर (Twitter Feature) टेस्ट करत आहे. हे फिचर्स यूजर्स (Twitter User) जर चुकीची पोस्ट (Twitter Post) आणि चुकीचा संवाद करत असेल तर तातडीने इशारा देईल. 'द वर्ज'च्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात आयएएनएसने म्हटले आहे की, सुरु असलेल्या संवादावेळी जर कोणी आक्षेपार्ह अथवा चुकीची भाषा वापरत असेल तर संबंधित युजर्सला त्याच वेळी सावध केले जाईल. आपल्या संवादातून उद्भवू शकतो. आपली भाषा आक्षेपार्ह आहे, असे युजर्सला सांगितले जाईल. या फिचर्सवर ट्विटर (Twitter) सध्या काम करत असल्याचे वृत्त आहे.

ट्विटर युजर जर एखाद्या सखोल, गंभीर चर्चेदरम्यान एकेका प्रतिक्रियेचे उत्तर देण्याचा प्रयत्न असेल तर एक-दोन अशा प्रतिक्रियांसाठी तसेच संबंधीत पोस्टबाबत सहानुभूती दर्शवण्यासाठी तीन चिन्हे देईल. मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या सपोर्ट पेजवर लिहिले आहे, 'आम्ही अँड्रॉइड आणि आयओएस संकेतांचे परीक्षण करत आहोत. जे आपल्याला सूचना करेन की ज्यांच्याशी आपण संवाद साधत आहात तो संवाद अधिक वादग्रस्त होऊ शकतो.' (हेही वाचा, Twitter वर आता शिविगाळ केल्यास 7 दिवसांसाठी ब्लॉक होणार अकाउंट- रिपोर्ट्स)

यूजर्सने केलेल्या ट्विटमध्ये काही आक्षेपार्ह असेल तर ट्विटर लागलीच त्याला सावध करेन. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जर युजर्स एखादा लेख, पोस्ट रीट्विट करण्याचा प्रयत्न करत असेल तरीही वादग्रस्त ट्विटरबाबत संबंधित युजर्सला इशारा दिला जाईल. ट्विटरचे हे फिचर चुकीचे आणि दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या ट्विट आणि युजर्सला आळा घालण्यासाठी मदतगार ठरेन, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.