Twitter (Photo Credits: IANS)

ट्विटरवर (Twitter) शिविगाळ करणाऱ्यांना आता जरा जपूनच रहा. कारण ट्विटर एक नवे सेफ्टी मोड (Safety Mode) ची टेस्टिंग करत असून चुकीच्या भाषेत बोलणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार आहे. म्हणजेच जर ट्विटरवर तुम्ही शिविगाळ केल्यानंतर तुम्ही त्यात दोषी असाल तर अशा लोकांचे अकाउंट 7 दिवसांसाठी ब्लॉक केले जाणार आहे. ट्विटरवर शिविगाळ आणि चुकीच्या पद्धतीने ट्रोल करणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आहे. यावर आळा घालण्यासाठी हे नवे फिचर आणले जाणार आहे.

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने म्हटले की, चुकीच्या भाषेत बातचीत आणि हेटफुल रिमार्क करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. ट्विटरचे नवे सेफ्टी फिचर हे आयओएस (iOS) आणि अॅन्ड्रॉइड या दोन्ही युजर्ससच्या छोट्या समूहासाठी रोलाआउट केले आहे. तर अन्य जणांसाठी हे लवकरच उपलब्ध करुन दिले जाणार आहे. ट्विटरचे हे नवे फिचर सुरुवातीला फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध असणार आहे. याबद्दल ट्विटरने बुधवारी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये सांगितले आहे.(Samsung ने बाजारात आणला जगातील पहिला 200 MP चा कॅमेरा सेंसर; कमी प्रकाशातही फोटो येणार क्लियर, जाणून घ्या काय आहे खास)

ट्विटरवर धोकादायक भाषेत बोलल्यास सुरुवातीला 7 दिवस अकाउंट ब्लॉक होणार आहे. त्याचसोबत शिविगाळ करणाऱ्यांना सुद्धा नोटीस पाठवली जाणार आहे. हे फिचर सेटिंगमध्ये जाऊन टर्न ऑन करावे लागणार आहे. त्यानंतर ट्विटरची सिस्टिम निगेटिव्ह इंगेजमेंटवर नजर ठेवणार आहे. ट्विटरवरील कंटेट आणि ट्विट करणारा युजर्ससह त्यावर रिप्लाय करणाऱ्यावर ही लक्ष असणार आहे.

कंपनीने असे म्हटले आहे की, जर तुम्ही एखादे अकाउंट फॉलो केले असेल आणि त्याच्यासोबत तुम्ही दररोज बातीत करत असाल तर कंपनी असे अकाउंट ऑटो ब्लॉक करणार नाही आहे. चुकीच्या भाषेत ट्विट करणाऱ्या युजर्सची ओळख पटवली जाणार आहे. तसेच त्याला ऑटो ब्लॉक केल्यास कोणालाही त्याला फॉलो करता येणार नाही आहे. त्याचसोबत डायरेक्ट मेसेज ही पाठवता येणार नाही.