Samsung (Photo Credit: Fortune)

सॅमसंगने (Samsung) आपला 200MP ISOCELL HP1 सेन्सर (Sensors) बाजारात आणला आहे. या 200-मेगापिक्सल सेन्सरसोबतच कंपनीने ISOCELL GN5 50-Megapixel कॅमेरा सेन्सरचे अनावरणही केले आहे. लॉन्च केला गेलेला हा 200 मेगापिक्सेल कॅमेरा सेंसर जगातील असा पहिला सेन्सर आहे, जो 0.64 µm पिक्सेल सेन्सरसह येतो. दुसरीकडे, कंपनीचा नवीन 50-मेगापिक्सेल सेन्सर हा जगातील पहिला सेन्सर आहे, जो ड्युअल पिक्सेल प्रो तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. सॅमसंगच्या 200 मेगापिक्सलच्या ISOCELL HP1 सेन्सरमध्ये ChamleonCell तंत्रज्ञान वापरले गेले आहे, जे पिक्सेल बायनिंग तंत्रज्ञानावर कार्य करते.

सॅमसंगचा हा सेन्सर कमी प्रकाशात आजूबाजूचे 16 पिक्सेल एकत्र करून मोठ्या 2.5μm सह 12.5 मेगापिक्सलचे फोटो कॅप्चर करतो. यामुळे, या सेन्सरसह काढलेले फोटो खूप ब्राईट आणि स्पष्ट येतात. Samsung च्या 50MP ISOCELL GN5 सेन्सर बद्दल बोलायचे तर हा ड्युअल पिक्सेल प्रो टेक्नॉलॉजीवर काम करतो. ड्युअल पिक्सेल प्रो तंत्रज्ञाना ऑल-डायरेक्शनल ऑटोफोकसिंग टेक्नॉलॉजी असेही म्हणतात. यामुळे सेन्सर त्वरित फोकस मिळतो, याद्वारे कमी प्रकाशातही उत्तम फोटो येतात.

हा सॅमसंग सेन्सर 30fps वर 8K व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. 8K व्हिडिओसाठी तो रिझोल्यूशन 50MP किंवा 8192x6144 वर आणतो. या सेन्सरने क्लिक केलेले फोटो कॉपी करूनही त्यांची गुणवत्ता तशीच राहते. (हेही वाचा: Samsung Galaxy S20 FE 5G: सॅमसंगच्या 'या' स्मार्टफोन मिळतेय 40 हजारांपर्यंत सूट, पहा याची वैशिष्ट्ये)

कंपनीने अद्याप माहिती शेअर केलेली नाही की, कोणत्या स्मार्टफोन सीरीजमध्ये 200MP कॅमेरा सेन्सरचा सपोर्ट असेल, पण असा अंदाज लावला जात आहे की आगामी सॅमसंग गॅलेक्सी एस 22 मालिकेत या कॅमेरा सेन्सरचा सपोर्ट असू शकतो. या फोनमध्ये Exynos 2200 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. याशिवाय HD प्लस AMOLED डिस्प्ले आणि एक चांगली बॅटरीदेखील मिळू शकते.