Apple Watch Series 7 च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात; पहा काय आहे खासियत आणि किंमत
Apple Watch Series 7 (Photo Credits: Apple)

अॅपल वॉच सिरीज 7 (Apple Watch Series 7) च्या प्री बुकिंगला (Pre-Booking) आजपासून सुरुवात होत आहे. मागील महिन्यात हे स्मार्टवॉच आयफोन 13 सिरीज (iPhone 13 Series), आयपॅड मिनी (iPad Mini) आणि न्यू आयपॅड (New iPad) सह लॉन्च करण्यात आले. आज संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून याच्या प्री-बुकिंगला सुरुवात होणार आहे. अॅपल इंडिया (Apple India), अॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) या वेबसाईटवरुन प्री-बुकिंग करता येईल. दरम्यान, हे स्मार्टवॉच 15 ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल, अशी माहिती अॅपल इंडियाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

मागील आठवड्यात वॉच सिरीज 7 च्या किंमतीबाबत Tipster Ishan Agarwal कडून खुलासा करण्यात आला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोनचे 41mm साईजचे अॅल्युमिनियम मॉडल 41,900 रुपयांना तर 45mm मॉडल 44,900 रुपयांना उपलब्ध होईल.

तर 41 आणि 45mm चे सेल्युलर वेरिएंट अनुक्रमे 50,900 आणि 53,900 रुपयांना उपलब्ध असेल. त्याचबरोबर अॅपल वॉच सिरीज 7 स्टेनलेस (GPS + Cellular only) चे 41 आणि 45mm मॉडल्स अनुक्रमे 69,900 आणि 73,900 रुपयांना मिळेल.

Apple Watch Series 7 (Photo Credits: Apple)
Apple Watch Series 7 (Photo Credits: Apple)

अॅपलच्या या नव्या वॉच सिरीजमध्ये रेटिना डिस्प्ले, thin bezels आणि S6 chip देण्यात आलं आहे. हे स्मार्टवॉच 5 शेड्स मध्ये उपलब्ध आहे- green, blue, red, starlight आणि midnight. त्याचबरोबर हे वॉच crack, dust आणि water-resistant आहे. याला सॉफ्ट राऊंट कॉर्नर्स, रिडिझाईन बटण, फुल किपॅड, 18 तासांची बॅटरी लाईफ आणि USB-C चार्गिंग पोर्ट देण्यात आला आहे. अॅपल वॉच सिरीज 7 watchOS 8 out of the box वर कार्यरत आहे. यात हेल्थ ट्रॅकिंग फिचर देखील देण्यात आले आहे. याद्वारे ब्लड ऑक्सिजन पातळी, atrial fibrillation tracking आणि ECG याची माहिती मिळते.