एआय चॅटबॉट कंपनी फॉरएव्हर व्हॉइसेसच्या सेवा विस्कळीत ( AI Chatbot Services Disrupting) झाल्या आहेत. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ जॉन मेयर (John Mayer Arrested) यांना एका प्रकरणात अटक झाली. त्यानंतर कंपनीची सेवा अक्षरश: कोलमडून पडली. ज्याचा परिणामा हजारो वापरकर्त्यांच्या सेवा वापरताना अडथळे येण्यात झाला आहे. फॉरएव्हर व्हॉइसेसने 23 ऑक्टोबर रोजी कार्य करणे अचानक बंद केले. ज्यामुळे वापरकर्त्यांचा त्यांच्यासोबतच्या व्हर्च्युअल व्यक्तिमत्त्वांशी परस्परसंवादा अचानक थांबला. परिणामी वापरकर्त्यांमध्ये एकच संभ्रम निर्माण झाला. टेक्सासमधील मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या आरोपांमुळे जॉन मेयर यांना अटक झाली. त्यानंतर त्यांच्या कंपनीची सेवा विस्कळीत झाली आहे.
अटक आणि मालमत्तेचे नुकसान:
टेक्सास येथील कंपनीचे कार्यालय असलेल्या इमारतीमध्ये काही वस्तू पेटविल्या आणि जाळले प्रकरणी सीईओ जॉन मेयर यांना अटक करण्यात आली आहे. ज्यामुळे अंदाजे $360,000 इतके नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, या कायदेशीर कारवाईमुळे फॉरएव्हर व्हॉईसला त्याचे कार्य थांबवण्यास सांगितले गेले. ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या एआय चॅटबॉट्समध्ये प्रवेश करता आला नाही. (हेही वाचा,OpenAI Sacks CEO Sam Altman: ओपनएआयचे संस्थापक सॅम ऑल्टमनला CEO पदावरून हटवले, काय आहे कारण? जाणून घ्या )
एआय चॅटबॉट्स:
Forever Voices ने प्रभावशाली कॅरिन मार्जोरी सारख्या वास्तविक व्यक्तींवर आधारित AI चॅटबॉट्स तयार केले आहेत. टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून, वापरकर्ते या व्यक्तिमत्त्वांच्या आभासी व्यक्तीमत्वांसोबत स्वत:ला व्यग्र ठेऊ शकतात. सुरुवातीला प्रौढ सामग्रीसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध नसतानाही. वापरकर्त्यांनी त्याचा वापर लैंगिक संवादाच्या आधारावर केला. त्यामुळे AI चॅटबॉट परस्परसंवादाच्या स्वरूपामध्ये करावा लागला.
ऑफलाइन जाण्यापूर्वी, फॉरएव्हर व्हॉईस खात्याने सोशल मीडियावर एक माहिती पोस्ट केली. ज्यात सेवा ऑफलाइन होण्यापूर्वी, Forever Voices खात्याने X (पूर्वीचे Twitter) वर FBI, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि "CIA दहशतवादी" यांचा समावेश असलेल्या गुप्त कट रचल्याचा दावा करत एक घटनाक्रम सांगितला गेला.
एक्स पोस्ट
CarynAI 2.0 Coming soon! 👀 pic.twitter.com/wdD594X7YJ
— Caryn Marjorie (@cutiecaryn) October 30, 2023
अधिक माहिती अशी की, Forever Voices, एक कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला टेलिग्राम द्वारे असंख्य सेलिब्रिटी AI “व्हर्च्युअल गर्लफ्रेंड” चॅटबॉट्स लाँच केले. कंपनीचे संस्थापक आणि CEO यांना अटक झाल्यानंतर 23 ऑक्टोबर पासून ही सेवा ऑफलाइन झाली, न्यूज नेशनने वृत्त दिले आहे.
फॉरएव्हर व्हॉइसेसचे सीईओ जॉन मेयर यांना ऑक्टोबरमध्ये ऑस्टिन, टेक्सासच्या डाउनटाउनमधील त्याच्या उच्चभ्रू अपार्टमेंटच्या बाल्कनीत पेटी पेटवल्याबद्दल कथितपणे ताब्यात घेण्यात आले होते, असे स्थानिक वृत्त आउटलेट KXAN ने वृत्त दिले आहे. त्यांच्यावर जाळपोळ आणि दहशतवादी धमक्यांचा आरोप ठेवण्यात आला आहे.