TikTok | Representational Image| (Photo Credits: Getty Images)

टीक टॉक (Tik Tok) चाहत्यांसाठी एक सुखावह बातमी आहे. लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग अॅप टीक टॉक आता गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध झालं आहे. मद्रास उच्च न्यायालयाने लावलेल्या बंदीनंतर टीक टॉक अॅप डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध नव्हतं. आता मात्र तुम्ही तुमच्या आवडीचे टीक टॉक अॅप डाऊनलोड करुन त्याचा आनंद घेऊ शकता. 3 एप्रिल रोजी मद्रास हायकोर्टाने दिलेल्या बंदीच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी आयटी मिनिस्ट्रीने गुगल आणि अॅपल कंपन्यांना अॅप ब्लॉक करण्यास सांगितले होते. TikTok वरील बंदी हटवल्यानंतरही Google आणि Apple स्टोअरवर अ‍ॅप नाही, हे आहे कारण

वकील मुटूकुमार यांनी दाखल केलेल्या केसमुळे मदुराई खंडपीठाने सांगितले की, या अॅपवरील बंदी काढून टाकण्यात यावी आणि अॅपवर कोणत्याही प्रकारचा पॉर्नोग्राफिक व्हिडिओ अपलोड करता येणार नाही अशी अट घालण्यात आली. जर असे आढळल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे खंडपीठाने सांगितले.

चायनीज कंपनी ByteDance चे टीक टॉक हे अॅप असून भारतात त्याचे महिन्याला 120 मिलियन अॅक्टीव्ह युजर्स आहेत.

टीक टॉक अॅप पुन्हा अॅक्टीव्ह करण्यासाठी त्यावरील बंदी हटवली जाणे, गरजेचे असल्याचे गुगल आणि अॅपल या कंपन्यांचे म्हणणे होते.