Year Ender 2019: सरफराज अहमत याच्या जांभईपासून ते रिषभ पंत याचे बेबी-सिटींग पर्यंत या वर्षात व्हायरल झालेले हे 5 Funny Photos आणि Videos
सरफराज अहमद आणि एमएस धोनी (Photo Credits: Twitter)

वर्ष 2019 आता संपुष्टात येणार आहे. क्रिकेट विश्वचषक 2019, 2019-20 द्विपक्षीय मालिका आणि फुटबॉल खेळांसह अनेक स्पर्धांमधील असे अनेक फोटोज आणि व्हिडिओ आढळले आहेत ज्याने आपल्या आठवणींच्या संग्रहात एक विशेष स्थान ठेवले आहे, सकारात्मक किंवा नकारात्मक कारणे विचारात न घेता. मग ते भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्यादरम्यान सरफराज अहमद जांभळी देतानाचा फोटो असो किंवा सुपरकॉप्पा इटालियाना 2019-20 दरम्यान लाझिओकडून झालेल्या पराभवानंतर क्रिस्टियानो रोनाल्डो आपले रौप्यपदक काढतानाचा व्हिडिओ, हे सर्व उदहारण इतके मोठे होते कि सर्वत्र या सर्व गोष्टींची चर्चा अजूनही होत असते आणि कदाचित पुढेही होईल. 2019 च्या या इयर एंडरमध्ये आम्ही अशा बर्‍याच घटनांबद्दल बोलू ज्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.

भारत-पाकिस्तान विश्वचषक मॅचमध्ये सरफराज अहमद जांभई घेताना

भारतविरुद्ध विश्वचषक मॅचमध्ये एकीकडे पाक गोलंदाजांची धुलाई होत असताना कर्णधार सरफराज अहमद जांभई देताना आढळला त्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. सोशल मीडियात बर्‍याच मिम्सद्वारे सरफराजचा जांभई देतानाचा फोटो पोस्ट केले गेला.

विराट कोहलीने कथितपाने केली सरफराज अहमदची नक्कल

हा भारत आणि पाकिस्तान सीडब्ल्यूसी 2019 मधील त्याच सामन्यातला होता जेथे विराट कोहली कुलदीप यादव आणि इतरांसह डगआऊटमध्ये बसलेला दिसत होता. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कुणाची तरी नक्कल करताना दिसला आणि नेटिझन्सनी असा अंदाज लावला की कोहली पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमद याची नक्कल करत आहे.

रोनाल्डो आपले रौप्यपदक काढताना

जुव्हेंटसचा स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो याने सुपरकॉप्प इटालियाना 2019-20 मध्ये लाझिओने 1-3 ने पराभूत झाल्यानंतर मिळाले रौप्यपदक काढून टाकले. जुव्हेंटसच्या या स्टारने पदक आपल्या हातात ठेवले.

झिवाबरोबर अनेक भाषांमध्ये बोलताना एमएस धोनी

 

View this post on Instagram

 

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनी मुलगी झिवाबरोबर एकाधिक भाषांमध्ये बोलत होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला गेला होता जिथे धोनी त्याच्या प्रिय मुलीबरोबर विविध भाषांमध्ये बोलताना दिसला.

रिषभ पंतने केली टिम पेनच्या मुलांची बेबी-सिटिंग

यंदा वर्षाच्या सुरुवातीला, ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने फलंदाजीद्वारे केवळ चाहत्यांचे मनोरंजनच केले नाही, तर विकेटच्या मागे सलेगिंगनेहीप्रेक्षकांचे मनोरंजन केले. पेनने रिषभला त्याच्या मुलांना बेबी-सीट करण्याबद्दल स्लेज केले, ज्यावर पंतने त्याला 'टेम्पेरारी कॅप्टन' म्हणून संबोधित केले. दोंघांचे भाष्य स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाले. या संभाषणाविषयी बोलताना पेन म्हणाला, "दोन्ही फलंदाजांमधील हे भाष्य अत्यंत हलके आणि मैत्रीपूर्व होते."

याशिवाय, असे अनेक व्हिडिओ आहे जे सोशल मीडियावर व्हायरल झाले. यंदाचे वर्ष संपताच हे दशकाची संपणार आहे. या वर्षी जगातील अनेक खेळाडूंनी त्यांच्या खेळणे आणि स्पोर्ट्स मॅन स्पिरिटने लोकांचे मन जिंकले. पुढील वर्षी खेळ जगतात मोठे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे आणि  यामध्ये खेळाडू कश्या प्रकारे आपलें मनोरंजन करतील यावर सर्वांचे लक्ष लागून असेल.