IND vs PAK, World Cup 2019: भारत-पाकिस्तान मधल्या 'AD-War' बद्दल सानिया मिर्झा म्हणते...
Image Credit/ Getty Images/ (Facebook)

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध होणाऱ्या विश्वकप सामान्यसाठी वातावरण निर्माण करण्यासाठी दोन्ही देशातील टीव्ही चॅनेल्स ने 'मौका-मौका' ची नवीन जाहिरात बनवली आहे. भारताची जाहिरात जितकी मजेदार आहे पाकिस्तानने बनवलेले तितकीच वादग्रस्त कारण त्यात त्यांनी भारतीय सैनिक असलेल्या अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) यांच्या प्रतिमेचा वापर प्रतिकात्मकरित्या वापर केला आहे. भारत आणि पाकिस्तानी मध्ये रंगणाऱ्या या 'AD-war; बद्दल, आंतरराष्ट्रीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) ने ट्विटरवर आपले मत प्रदर्शित केलेत. (ICC World Cup 2019: क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मधील India vs Pak सामन्यावरुन पाकिस्तानच्या Jazz TV वर जाहिरात, विंग कमांडर अभिनंदन यांच्या प्रतिमेचा वादग्रस्त पद्धतीने वापर)

सानिया म्हणते, 'दोन्ही देशांमध्ये अशा द्वेश निर्माण करणाऱ्या जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या जाहिरातींची खरचं आवश्यकता नाही. मुर्खपणाचा बाजार मांडला आहे. हा केवळ क्रिकेट सामना आहे आणि त्याची दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये चांगली उत्सुकता आहे."

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मैच आधीच दोन्ही देशातील टीव्ही एकमेकांना जाहीरातींमधून टशन देत आहे. याच मैच च औचित्य साधून मौका-मौकाची ही जाहिरात बनवण्यात आली आहे. भारताने बनवलेल्या  व्हिडीओ मध्ये विकास मल्होत्रा हा अभिनेता पाकिस्तानी संघाचा फॅन दाखवला असून आपल्या वडिलांचा सल्ला आठवत असतो, ज्यात त्याचे वडील त्याला कधीही न हरता जिद्दीने जिंकण्याचा प्रयत्न कर असं सांगतात पण तेव्हा एक भारतीय संघाचा फॅन त्याला मी तुला कधी विचारलं असं विचारून टोमणा मारतो.