Cricketers Hayley Jensen and Nicola Hancock get married (Photo Credits: Melbourne Stars Twitter)

प्रेमाला रंग, रूप, वय, वर्ण, लिंग अशा कशाचेच बंधन नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अनेक देशांनी समलैंगिक व्यक्तींनाही त्यांच्या मर्जीप्रमाणे प्रेम आणि लग्न करण्याचा अधिकार बहाल केला आहे. याच पार्श्वभूमीवर क्रिकेट विश्वातील दोन दिग्गज महिला खेळाडू (Women Cricketers) मागच्या आठवड्यात लग्नबंधनात अडकल्या. न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू हेली जेनसन (Hayley Jensen) आणि ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू निकोला हॅनकॉक (Nicola Hancock) यांचा विवाहसोहळा न्यूझीलंड येथे मोठ्या थाटात पार पडला. या लग्नाचे फोटो सध्या व्हायरल झाले असून, सर्वत्र या लग्नाची चर्चा होत आहे.

26 वर्षीय हेली जेलसन ही न्यूझीलंडकडून 7 एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळणारी जलदगती गोलंदाज आहे. बिग बॅश वूमन लीगच्या पहिल्या दोन आवृत्त्यांमध्ये मेलबर्न स्टार्ससाठी हेली खेळली होती. तर 23 वर्षीय निकोला ऑस्ट्रेलियन ट -20 लीगमध्ये 'टीम ग्रीन' चे प्रतिनिधित्व करत आहे. तिने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही. (हेही वाचा: समलैंगिक जोडी पहिल्यांदाच मुंबईत लग्नबेडीत अडकली)

दोघींनीही पारंपारिक ख्रिस्चन पद्धतीने लग्न केले. लग्नाच्या पांढऱ्या गाऊनमध्ये दोघीही अतिशय सुंदर दिसत होत्या. मेलबर्न स्टार्सने आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावर या लग्नाचा फोटो पोस्टकरून दोघींनाही नव्या जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेची महिला क्रिकेटपटू डेन वॅन निकेर्क आणि मॅरिजाने कॅप या दोघी लग्नबंधनात अडकल्या होत्या.